हिंगणघाट: ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी आ.कुणावारांच्या नेतृत्वात आंदोलन.

✒ मुकेश चौधरी ✒
उप संपादक मिडिया वार्ता न्युज
7507130263
हिंगणघाट,दि.16 सप्टेंबर:- हिंगणघाट येथे ओ.बी.सी. समाजाच्या हक्काचे राजकीय आरक्षण तत्काळ लागू करण्यात यावे मागणीसाठी आज दि.15 रोजी भाजपाच्यावतीने हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिरभाऊ कुणावार यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतांनी, माजी जि.प.अध्यक्ष नीतिन मडावी, भाजयुमोचे प्रदेश सचिव अंकुश भाऊ ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, पंचायत समिति सभापती सौ.शारदा आंबटकर, समुद्रपुर प.स.सभापती सौ.सुरेखा टिपले, माजी पंचायत समिति सभापती गंगाधर कोल्हे, भाजपा तालुकाध्यक्ष आकाश पोहाणे, संजय डेहणे, आशिष पर्बत इत्यादि पदाधिकारी उपस्थित होते.
आज 11 वाजताचे दरम्यान स्थानिक भाजपा जनसंपर्क कार्यालयातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले, सदर मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.येथे ओ.बी.सी समाजाला राजकीय आरक्षणापासुन वंचित ठेवणाऱ्या राज्य शासनाचा घोषणाबाजी करीत जोरदार निषेध करण्यात आला.
आमदार समिर कुणावार यांनी तहसील कार्यालयासमोर मोर्चाला संबोधित करतांना ओ.बी.सी. समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही तो पर्यंत शासनाने निवडणुका घेवू नये अशी मागणी केली. याप्रसंगी भाजपाच्यावतीने उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांचेमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नावे निवेदन देण्यात आले.
सदर आंदोलनाचा वेळी शंकर मुंजेवार, नगरसेवक राजू कामडी, चंद्रकांत मावळे, सौ.रविला आखाड़े, सौ.शुभांगी डोंगरे, सौ.शारदा पटेल,योगेश फुसे,गणेश उगे, भाजयुमोचे सोनु पांडे, समुद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गजानन राऊत, जिल्हा परिषद सदस्य रोशन भाऊ चौके, पंचायत समिती सदस्य डॉ. विजय पर्बत, वामनराव चंदनखेडे, पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे, बालू इंगोले, अंकुश खुरपडे, विनोद विटाळे, सुभाष जी कुंटेवार, भाग्येश देशमुख, कवीश्वर इंगोले, विठु बेनीवार, योगेश बोंडे, नितीन वाघ, विशाल गौळकर, विक्की राऊत, अमोल चौधरी, सुनील सरोदे, अक्षय हरगुडे, सचिन सोनटक्के, पंचायत समिती सदस्य वैशाली ताई पुरके, अरुणा हेमके, प्रतिभा नव्हाते, शिवाजी आखाडे, नगरसेवक मारुती साठे, अमन काळे, समाजसेवक अमोल खंदार, सुनील भाऊ डोंगरे, अर्चनाताई मावळे, ज्ञानेश्वर भागवते इत्यादिसह शेकडो पक्षकार्यकर्ते उपस्थित होते.