मुंबई गोवा महामार्गवर कार व मोटारसायकलचा अपघात, कारची दुचाकीला धडक
✍सचिन पवार ✍
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :- माणगांव तालुक्यातील घोटवलं गावच्या हद्दीत दि 13 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास एका कारची दुचाकीला धंडकं लागून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात आरोपी हा त्याच्या ताब्यातील होंडा एक्सएन्ड गाडी क्र एम एच 04 एचएन 9989 ही राष्टीय महामार्ग मुबंई गोवा हायवेने मुबंई बाजूकडे माणगांव बाजूकडे जात असताना माणगांव बाजूकडून मोटारसायकल क्र एम एच 06 सी ओ 2424 वरील चालक आतिष चंद्रकांत म्हस्के रा भुवन ता माणगांव जि रायगड यांना धडक मारून अपघात झाला यामध्ये मोटारसायकल चालक याला लहान मोठया स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून अपघातात दोन्ही वाहनाचे नुकसान झाले असून समोरील आरोपी अपघाताची खबर नं देता तेथून तो पळून गेला आहे. माणगांव पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपी विरोधात कॉ गु रजि नं 263/2022 भा द वि सं कलम 279,337,338, मो वा का क,184,134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली पो ह तुनतुने हे करीत आहेत.