इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले

इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले

इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351

चंद्रपूर,15 सप्टेंबर
चंद्रपूर जिल्ह्यात रविवार व सोमवारी जोरदार पावसाने पुन्हा हजेरी लावली होती त्यामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने इरई धरणातही जलसाठा वाढला. त्यानंतर ‘कॅचमेंट एरिया’त पाऊस पडल्याने धरणाचा साठा अपेक्षेपेक्षा अधिक वाढला. धरणाची पाणी पातळी 207. 400 मिटर एवढी झाली. त्यामुळे गुरुवार, 15 सप्टेंबर रोजी 6 वाजून 30 मिनिटांनी या धरणाचे तीन दरवाजे 0.25 मिटरने उघडण्यात आले.
धरणाचे क्रमांक 1, 4 व 7 क्रमांकाचे दार उघडण्यात आले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, 11 व 12 सप्टेंबरला पुन्हा दमदार बरसलेल्या पावसाने नदी, नाले, तुडूंब भरून वाहू लागल्याने जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे.
==========

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here