इगतपुरीमध्ये बैल जोडी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा खास सन्मान

51

नांदडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश खातळे यांच्या संकल्पनेतून बैल जोडी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान

मीडियावार्ता 

इगतपुरी प्रतिनिधी

आधुनिक काळात बैल जोडी संपुष्टात येत असल्याचे सदैव दिसत असले तरी ग्रामीण भागात आजही शेतकरी मोठ्या मेहनतीने बैल जोडी पाळतात ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असून यापुढे नवनवीन उपक्रम राबवून शेतकऱ्याना प्रोत्साहन देऊन अंगात बळ भरले जाणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश खातळे यांनी केले. नांदडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य उमेश खातळे यांच्या संकल्पनेतून बैल जोडी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचे कौतुक करण्यात आले. ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

पोळा सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांची व त्यांच्या बैलजोडीची मारुती मंदिरा समोर पूजा करुन शेतकऱ्याना ट्रॉफी देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी बैलांची उत्कृष्ट सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गौरव करण्यात आला. शेतकरी वसंत खातळे , गंगाराम सोणवणे, चेंडू भरित यांना क्रमवारीने सन्मानित करण्यात आले. शेतकऱ्यांचे कैवारी मा. शरद पवार यांचे प्रेरणादायी विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उपक्रम सुरू असून बळीराजाच्या हितासाठी यापुढेही असे नवीन उपक्रम राबवून बळ भरले जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष उमेश खातळे यांनी सांगितले.

याप्रसंगी उमेद खातळे, नामदेव खातळे , मनोहर खातळे , देविदास सोणवणे, शरद सोनवणे, विष्णु सोनवणे, बस्तिराम खातळे , पुंडलिक सोणवने, राजु खातळे ,अशोक खातळे , भाऊसाहेब खातळे , गणेश खातळे ,सागर खातळे ,ञ्यंबक रणदिवे, गणेश खातळे ,गॊरव खातळे ,दर्शन खातळे ,काळु सोणनणे, प्रभाकर खातळे , शुकदेव सोणवने, सुर्यभान खातळे ,ढुमने , तानाजी खातळे , रमेश खातळे , योगेशर सुर्यवंसी , दॊलत खातळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The Biggest Amazon SALE LIVE Now…Click On The Banner To Get Discount Up To 50%