गडचिरोली आढावा बैठक होऊ द्या चर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संस्कृतीभवन गडचिरोली येथे संपन्न, शासनानी कागदावर राबवीत असलेल्या योजनेच्या विरोधात भांडाफोड उपक्रम जिल्ह्यात राबविणार महेश केदारी यांचे आवाहन…      

मारोती काबंऴे 

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मों.नं.9405720593

 गडचिरोली:- दिनांक 12 9 2023 रोजी सांस्कृतिक भवन गडचिरोली येथे श्री महेश जी केदारी गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात होऊ द्या चर्चा हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात राबवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सभा संस्कृती भवन येथे आयोजित करण्यात आले या सभेत श्री महेश केदारी जिल्हा संपर्कप्रमुख गडचिरोली यांनी आपल्या मार्गदर्शनात केंद्र शासन व राज्य शासन केवळ भुलभुलय्या कागदावर योजना राबवीत असल्याने याचा लाभ जनतेला होत नसून जनतेची दिशाभूल करून मूलभूत योजनेपासून जनतेला वंचित ठेवण्यात येत आहे बेरोजगारांना नोकरी नाही शेतकरी अन्नदाता यांना सुद्धा वाऱ्यावर सोडलेले आहे.

एकेकडी शेतकरी दुष्काळग्रस्त ओलाग्रस्त झाल्याने शेतकरी चिंतेत आहे दिवसेंदिवस शेतकरी बांधवांचे आत्महत्याचे प्रकरण खूप वाढून राहिले त्याचप्रमाणे महागाई सतत वाढल्याने गरीब वर्ग मध्यमवर्गना याच्या परिणाम भोगाव लागत आहे महिला सुरक्षित नाही तसेच गडचिरोली जिल्ह्यात ज्याप्रमाणे विकास व्हायला हवा होता त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याच्या विकास झाला नाही येथील लोकप्रतिनिधी जनतेला वाऱ्यावर सोडलेला आहे गडचिरोली जिल्ह्यात लोह प्रकल्प सारखा लोह प्रकल्प असून सुद्धा स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही बाहेर इतर राज्याचे लोक येऊन सुरजागड लोह प्रकल्पात नोकरी मिळून घेत आहे स्थानिक बेरोजगार वर अन्याय करीत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी खासदार आमदार यांनी सुद्धा डोळेझाक करीत आहे प्रथमता स्थानिक युवकांना सुरजगड लोह प्रकल्पात गडचिरोली जिल्ह्यातील प्रथम स्थान देऊन बेरोजगारांना नोकर भरती मध्ये घ्यायला पाहिजे परंतु याकडे शासन नेतेमंडळी यांच्या दुर्लक्षामुळे गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकावर सतत अन्याय होत आहे.

असे अनेक प्रश्न महाराष्ट्र राज्यात व गडचिरोली जिल्ह्यात लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने याच्या भांडाफोड करण्यासाठी होऊ द्या चर्चा हा विशेष उपक्रम घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील खेड्यापाड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती गटनुसार होऊ द्या चर्चा या माध्यमाने अभियान राबविण्यात येत असल्याची आपल्या संभाषणात पदाधिकाऱ्यांना श्री महेश जी केदारी आव्हान केले.

यावेळी गडचिरोली जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके, आरमोरी जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल, अहेरी विधानसभा जिल्हाप्रमुख रियाज शेख, यांनी सुद्धा यावेळी होऊ द्या चर्चा या विषयावर उपस्थित पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या सभेत गडचिरोली सहसंपर्कप्रमुख अरविंद कात्रटवार अहेरी विधानसभा संपर्कप्रमुख विलास कोळपे गडचिरोली जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे अहेरी विधानसभा जिल्हा संघटिका करुणाताई जोशी युवती जिल्हा अधिकारी तुळजा ताई तलांडे युवा सेना जिल्हा अधिकारी दिलीप सुरपाम उपजिल्हाप्रमुख सुनील पोरेड्डीवार विधानसभा संघटक नंदू भाऊ कुंभारे तालुकाप्रमुख अहेरी मनीष दुर्गे तालुकाप्रमुख शिरोंचा रघु जाडी तालुकाप्रमुख भामरागड कुशाल मडावी तालुकाप्रमुख मुलचेरा नीलकमल मंडल तालुकाप्रमुख अहेरी प्रफुल एरणे सुनील वासनिक युवा सेना तालुका अधिकारी अक्षय पुंगाटी शहर प्रमुख अहेरी राहुल आईलवार चामुर्शी तालुकाप्रमुख पोरते, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख बघ मारे धानोरा तालुकाप्रमुख किरण शेडमाके आरमोरी तालुका प्रमुख जिल्ह्यातील शहर प्रमुख उपतालुकाप्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख असे असंख्य पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी संचालन सुनील भाऊ पोरेड्डीवार यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी विधानसभा वाईज आढावा बैठक घेतले आणि गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणानुसार होऊ द्या चर्चा हा उपक्रम राबवण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here