*माझ्या घरात* *आज मी आहे,*

60

*माझ्या घरात*
*आज मी आहे,*
*उद्या मी नसेन,*
*माझ्या जागी*
*एक मिणमिणता दिवा* *असेल .*

*दहा दिवसांनी तो दिवा विझेल*
*त्या जागी माझा एक फोटो असेल,*
*लाकडी चौकट*,
*कोरीव नक्षीकाम,*
*हसरा फोटो.*

*काही दिवसांनी*
*माझ्या लटकलेल्या फोटोवर*
*साचलेली धूळ असेल*
*किंवा त्या फोटोची पातळ काच*
*वेडीवाकडी तडकलेली असेल .*

*काही वर्षांनी*
*माझा तो हसरा फोटो*
*भिंतीवरच्या छिद्रातून*
*खिळ्यासकट निखळलेला असेल…*

*आणि मग त्यानंतर*
*पिढ्यान् पिढ्या*
*माझ्याच घरात*
*माझ्या नावाचं*
*फक्त उरलेलं एक छिद्र* *असेल !*

आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण ‘उत्सवात’ करायचं का ?

कोणाला ही दुखवू नका,
कोणालाही कमी लेखू नका,
कोणाचाही अपमान करु नका,
नाती जपा, प्रेम द्या, प्रेम घ्या,
सर्वांशी आपुलकीने वागा,
संवाद साधा, कायम संपर्कात रहा….
कारण, तुम्ही केलेले हे कर्म तुमच्याकडेच येणारे असते…..
म्हणूण *सतत सर्वांशी संवाद साधत रहा आणि नाती जपा…..*

*विचार करा…*
🙏🙏आनंदी रहा 🙏🙏