कृषिदुता मार्फत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा/आष्टा ( नेरी ) :१५/१०/२१ महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापुर येथील कृषीदुत स्वप्निल मारोतीराव लांडगे याने ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगीक कार्यानुभव कार्यक्रम 2021-2022 अंतर्गत गांव -आष्टा (नेरी) येथील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावीत याबद्दल प्रत्यक्ष शेतात जावून प्रात्यक्षिके घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी रासायनिक औषधांची फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना गावातील प्रगतशील शेतकरी विनोद नारायण वेले यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक करण्यात आले.
आधुनिक सिंचन सामग्री, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन, मातीपरिक्षण, जैविक खतांचे महत्व,बोर्डो मिश्रण, अन्नद्रव्ये कमतरता व उपाययोजना, खतव्यवस्थापन, कृषी विषयक योजना, जनावरांची काळजी व देखभाल आणि दुग्धोत्पादन, तसेच महिलांना धान्यांची साठवणूक खाद्यपदार्थ व दुग्धजन्य पदार्थ बनवून त्यांचे जीवनमान वाढवून त्यांची साठवणूक करणे इ. याबद्दल प्रात्यक्षिके करून त्यांना माहिती दिली.
सध्या कोरोना विषाणूच्या काळात कृषी कार्यानुभव कार्यक्रम घरीच योग्य पद्धतीने राबविण्याचा सुचना मा.सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु.बी.होले सर यांनी दिल्या आहेत. चेअरमन डॉ. एस. आर. कराड सर, कार्यानुभव समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे सर,कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एस. पोतदार सर तसेच सर्व विषयतज्ञ शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रात्यक्षिके व्यवस्थित केली.