साईबाबा ज्ञानपीठ कॉन्वेंट बल्लारपूर ने केली विद्यार्थ्यांची फीस माफ* *आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आव्हानाला लखनसिंह जी चंदेल यांनी दिला प्रतिसाद फी साठी दिले* *रु. दहा लाख*.

58

*साईबाबा ज्ञानपीठ कॉन्वेंट बल्लारपूर ने केली विद्यार्थ्यांची फीस माफ*

*आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आव्हानाला लखनसिंह जी चंदेल यांनी दिला प्रतिसाद फी साठी दिले*
*रु. दहा लाख*.

साईबाबा ज्ञानपीठ कॉन्वेंट बल्लारपूर ने केली विद्यार्थ्यांची फीस माफ* *आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आव्हानाला लखनसिंह जी चंदेल यांनी दिला प्रतिसाद फी साठी दिले* *रु. दहा लाख*.
साईबाबा ज्ञानपीठ कॉन्वेंट बल्लारपूर ने केली विद्यार्थ्यांची फीस माफ*
*आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आव्हानाला लखनसिंह जी चंदेल यांनी दिला प्रतिसाद फी साठी दिले*
*रु. दहा लाख*.

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपूर
मो 9764268694

बल्लारपूर :- आज दि. १४/१०/२०२१ ला साईबाबा ज्ञानपीठ कॉन्वेंट येथे मा. आमदार तथा माजी अर्थ व
वनविकास मंत्री मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत “कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान” या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चा सत्राकरिता शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला
वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष श्री. चंदनसिंहजी चंदेल, साईबाबा देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री.लखनसिंहजी चंदेल, न. प. बल्लारपूर चे नगराध्यक्ष श्री. हरीश शर्माजी, बल्लारपूर चे तहसीलदार श्री.संजय राईंचवार, बल्लारपूर चे ठाणेदार श्री. उमेश पाटील, भाजपा बल्लारपूर शहर अध्यक्ष श्री.काशीनाथ सिंह, श्री. समीर केने, शाळा समितीचे अध्यक्ष श्री. पी. वाचस्पती सर, साईबाबा ज्ञानपीठ
कॉन्वेंट च्या मुख्याध्यापिका श्रीमती किरण सिंह चंदेल, शाळा समितीचे सदस्य श्री. प्रभाकर
गजड्डीवार, श्री. गुलाब सिंह चौहान, श्री. स्वप्नील दोन्तुलवार, श्री प्रकाशजी पटेल, तसेच काही नगर सेवक आणि विविध शाळेचे प्राचार्य व शिक्षक तसेच सर्व पत्रकार मंडळी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित
होते.या कार्यक्रमात आपले मत मांडताना आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कोरोना काळात
पालकांची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे त्यांनी शाळा समिती ला आवाहन केले की सत्र २०२१
२०२२ मधील सर्व विद्यार्थ्यांची ६ महिन्याची फीस माफ करण्यात यावी. त्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रभू साईनाथ देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. लखनसिंह चंदेल यांनी वैयक्तिक खात्यातून
रु.१०,००,०००/- (अक्षरी रु. दहा लाख) फीस च्या स्वरुपात शाळेच्या नावाने दिला.
साईबाबा ज्ञानपीठ कॉन्वेंट बल्लारपूर ने विद्यार्थ्यांची १ नोव्हेंबर २०२१ ते ३१ एप्रिल
२०२२ पर्यंतची फीस माफ करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्यामुळे करोना काळात आर्थिक
समस्याने ग्रस्त असणाऱ्या पालकांना दिलासा देण्याचे काम साईबाबा ज्ञानपीठ कॉन्वेंट ने केले. याशाळेचा आदर्श इतर शाळेनी सुद्धा घेऊन करोना काळात आर्थिक समस्येने ग्रस्त असणाऱ्या पालकांना
आर्थिक दिलासा देण्याकरिता शाळेच्या फीस मध्ये सूट देऊन एक आदर्श निर्माण करावा या
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन चिंतामणी विद्यालय विसापूर चे प्राचार्य तथा सिनेट सदस्य श्री.प्रशांत दोन्तुलवार यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला.