समुद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १७ ऑक्टोबर ला होणार धान्य खरेदी चा शुभारंभ !

अक्षय बहादे
समुद्रपूर तालुका प्रतिनिधी
९५४५५५५९५१
समुद्रपूर १५ ऑक्टोबर २०२१
समुद्रपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने १७ ऑक्टोबर पासून सन २०२१-२०२२ या वर्षची धान्य खरेदी चा शुभारंभ करण्यात येणार आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.
तर याप्रसंगी समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिम्मतबाबू चतुर यांच्या अध्यक्षतेत ,उपाध्यक्ष मनीष निखळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणार आहे.
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी नवीन निघालेले धान्य स्वच्छ करून शुभारंभ प्रसंगी बाजार समितीत आणावे असे आव्हान संचालक अशोक वंदिले,महेश झोटिंग,महादेव बादले, उल्हास कोटनकर,जनार्धन हुलके,जीवन गोलुले,गंगाधर हिवज,शरद कारमोरे,संजय तुराळे,भोजराज दळने,गजानन शेंडे,श्रीमती रेखा जोगवे,गीता गुळघाणे, आशा भगत, आणि सचिव शंकर धोटे यांनी केले आहे .