गोवंश हत्या थांबण्याचं नाव घेत नाही..
खरच कायद्याची भीती व माणुसकी राहिलीच नाही का? काय मिळते असे करून?
🖋️ संदेश साळुंके
नेरळ, रायगड, जिल्हा प्रतिनिधी
📱 9011199333
कर्जत : नेरळ 14 ऑक्टोबररोजी दुपारी चीकानपाडा गावाकडून माले या गावाकडे जाणाऱ्या रोडवर पिकप क्रमांक mh 46 E 5354 है कर्तव्यदक्ष पोलीस शिपाई निरंजन संजय दवणे यांनी दिलेल्या माहिती नुसार गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन गाई व दोन बैल आढळून आल्या.
लगेच नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी धवळे यांनी घटना स्थळी धाव घेऊन चौकशी केली असता टेंपो मध्ये 2 गाई व 2बैल हे कत्तली करीता नेत असल्याचे प्राथमिक चौकशी दरम्यान समोर आले..
आरोपी नाझीम तनवीर बुबेरे व 45 वर्ष राहणार सरकारी दवाखान्याजवळ पोस्ट वाढवणे तालुका अंबरनाथ व परशुराम मोरगे वय 75 वर्ष राहणार पुढचा कुडसावरा पोस्ट वांगणी तालुका अंबरनाथ यांची चौकशी केली असता 4 गोवंशिय जनावरे दाटीवाटीने कोंबून चारा पाण्याची व्यवस्था करताना त्याला क्रूर पणे वागणूक देऊन कत्तली करिता नेत असल्याचे कबूल केले.
नेरळ पोलीस ठाणे ठाणे आमलसर प्रवीण लोखंडे यांनी गुन्हा नोंद करून गुन्हा क्रमांक 280/2023 प्राण्यांच्या क्रूरपणे वागण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11, 1 घ,ड, ज, प्रमाणे गुन्हा नोंद केला असून
अधिक तपास प्रभारी अधिकारी शिवाजी धवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे व पोलीस ज्ञानदेव दहातोंडे करीत आहेत.
मागील काही दिवसापूर्वी नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशी दुसऱ्यांदा घडली आहे मात्र पोलिसांच्या कर्तव्यदक्ष पणा मुळे ही कत्तल थांबली आहे. नेरळ पोलिसांच्या या कार्यवाही मुळे कत्तल कररण्याऱ्याचे धाबे दणाणले आहेत.