प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांचा सपत्नीक देहदानाचा संकल्प

46
प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांचा सपत्नीक देहदानाचा संकल्प

प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांचा सपत्नीक देहदानाचा संकल्प

प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांचा सपत्नीक देहदानाचा संकल्प

🖋️ रोशन लोणारे 🖋️
चंद्रपूर प्रतिनिधी
📱 9130553551 📱

चंद्रपूर दि. ८ ऑक्टोबर २०२३ रविवारला सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड तसेच त्यांची पत्नी जया बन्सोड यांनी देहदानाचा संकल्प केला. शासकीय मैडीकल कॉलेज, चंद्रपूर यांना त्यासंबंधी फॉर्म भरून दिले. प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर या संस्थेने, दिनांक ८ ऑक्टोबर २०२३ रविवारला, आयुष्याची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या वृद्धांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्या समारंभाला द्रोपदी कातकर, अध्यक्ष प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघ, डॉ. भास्कर सोनारकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, भास्कर झलके समाजसेवा अधिक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर, डॉ. प्रा. जे. टी. लोणारे, भास्कर मून तसेच प्रदिप अडकिणे उपस्थित होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांचे मरणोत्तर देहदानाचे फॉर्म समाजसेवक प्रदिप अडकिणे यांनी डॉ. भास्कर सोनारकर तसेच भास्कर झलके यांचे स्वाधीन केले. याप्रसंगी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केल्याबद्दल प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड तसेच त्यांची पत्नी जिया बन्सोड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.