क्रांतिपिता वस्ताद लहुजी साळवे यांची २२७ वी जयंती उत्साहात साजरी.

47

क्रांतिपिता वस्ताद लहुजी साळवे यांची २२७ वी जयंती उत्साहात साजरी.

क्रांतिपिता वस्ताद लहुजी साळवे यांची २२७ वी जयंती उत्साहात साजरी.
क्रांतिपिता वस्ताद लहुजी साळवे यांची २२७ वी जयंती उत्साहात साजरी.

देवेंद्र सिरसाट
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर

हिंगणा : – महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहब आम्बेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समतादूत प्रकल्प नागपुर विभाग तालुका हिंगणा व लहुजी क्रांती मोर्चा, मातंग समाज बांधव रायपूर (हिं) यांच्या संयुक्त विद्यमाने भोई समाज भवन रायपुर (हिंगणा) येथे दि.१४ नोव्हेंबर २०२१ ला क्रांतिपिता वस्ताद लहुजी साळवे यांच्या २२७ व्या जयंती निमित्ताने समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.
सर्व प्रथम क्रांतिपिता वस्ताद लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी लहुजी क्रांती मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष . कांताराम वानखेडे , विलास खडसे, श्रीमती हेमलता पाटील , दिलीप ढोके यांनी वस्ताद लहुजी साळवे यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. तसेच समतादूत सतीश सोमकुंवर यांनी क्रांतिपिता वस्ताद लहुजी साळवे यांच्या घराण्याचा गौरव शाली इतिहास व लहुजी साळवे यांचे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला दिलेले योगदान या विषयावर विस्तृत व मौलिक मार्गदर्शन केले. बार्टी, समाजकल्याण विभाग आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित समाज बांधवांना देवून जयंतीच्या हार्दीक शुभेच्या दिल्या.
प्रबोधन कार्यक्रमाला अंबादास काळे, संजय गायकवाड, पांडुरंग काळे,मुकेश दुपारे, कुंदन गायकवाड, अक्षय तेलंग, दिलीप गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय तेलंग तर दिलीप गायकवाड यांनी आभार मानले.