आजपासून तीन दिवस जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहीम* *शंभर टक्के लसिकरणासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी
आजपासून तीन दिवस जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहीम* *शंभर टक्के लसिकरणासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी

*आजपासून तीन दिवस जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहीम*

*शंभर टक्के लसिकरणासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी

आजपासून तीन दिवस जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहीम* *शंभर टक्के लसिकरणासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी
आजपासून तीन दिवस जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहीम*
*शंभर टक्के लसिकरणासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्यूरो चीफ
9860020016

यवतमाळ : – जिल्ह्यात पुढील तीन दिवस म्हणजे दि. 16, 17 व 18 नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरणाची व्यापक मोहीम राबविण्यात यावी, यात सर्व नगरपरिषदा तसेच दोन हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावांवर लक्षे केंद्रीत करून तेथे 100 टक्के लसिकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.
कोरोना लसिकरण संदर्भात जिल्हाधिकारी येडगे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तालुका टास्क समितीचा आढवा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, जिल्हा लसिकरण अधिकारी डॉ. सुहास कोरे तसेच दूरदृष्य प्रणालीमार्फत सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी उपस्थित होते.
सदर लसीकरण दरम्यान सर्व ग्राम समिती मधील सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, आशा वर्कर, कोतवाल, अंगणवाडी सेविका तसेच स्वयंसेवी संघटना यांनी पुढाकार घेऊन 100 टक्के लसीकरण होण्यासाठी प्रयत्न करावे. जिथे जास्त लसीकरण होईल तेथिल कर्मचाऱ्यांना सन्मान पत्र दिल्या जाईल, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
राज्य शासनाने 8 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत पहिल्या डोज चे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. सद्या जिल्यात 13 लक्ष्य नागरिकांना पहिला डोज व 5.50 लक्ष लोकांना दुसरा डोज देण्यात आला आहे. सद्या 9.50 लक्ष नागरिकांचा पाहिला डोज व 2.50 लक्ष नागरिकांचा दुसरा डोज घेणे बाकी आहे. जिल्हा स्तरावर मुबलक लस साठा उपलब्ध आहे तरी येत्या तीन दिवसात पहिल्या डोज चे 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे तसेच दुसरा डोजसाठी पात्र झालेल्या नागरिकांचे लसिकरण पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
आरोग्य विभागाने लसिकरणाबाबत नियोजन केले असून शहरी भागात 58 तर ग्रामीण भागात 310 पथके गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2000 पेक्ष्या जास्त लोकसंख्या असलेल्या गावात लोकसंख्येच्या प्रमाणात सत्राचे आयोजन केल्या जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी पी.एस. चव्हाण यांनी यावेळी दिली.
बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here