केमीस्ट व फार्मासिस्ट यांनी कोविड लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा

✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016
बुलडाणा : – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व केमीस्ट व फार्मासिस्ट यांनी कोविड लसीकरण मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा. या मोहिमेत आपण व आपल्या नातेवाईकांचे तातडीने लसीकरण झालेले नसल्यास ते करून घ्यावे. तसेच आपल्याकडे येणारे रूग्ण व रूग्णाच्या नातेवाईकांना कोराना लसीकरणाबाबत प्रेरीत करावे. त्यांना लसीकरणाचे फायदे व सुरक्षीततेविषयी माहिती द्यावी. सक्रीय सहभाग घेवून ही मोहिम जनमोहिम बनवावी, असे आवाहन औषध निरीक्षक गजानन घिरके यांनी केले आहे.