अल्ट्राटेक सिमेंट च्या विरोधात सरपंच संघटनांचे धरणे आंदोलन व साखळी उपोषण.
राजूरा तालूका प्रतिनिधी
✍🏽शुध्दोधन निरंजने✍🏽
9921115235
राजुरा :– अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपुर च्या विरोधात दत्तक ग्राम पंचायत सरपंच संघटना यांनी आक्रमक पवित्रा घेत धरणे आंदोलन व साखळी उपोषण सुरू केले आहे. दोन दिवस झाले असून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपुर यांनी यादरम्यान कंपनी विरोधात दत्तक ग्रामपंचायत ने पुकारलेल्या आंदोलनाची पाहिजे तशी दखल घेतलेली नाही त्यांच्या आंदोलनाला अखिल भारतीय सरपंच परिषदेने पाठिंबा दिला असून आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ग्रामपंचायत कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी कळमना ग्रामपंचायत व गावकरी मंडळीनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपुर चा निषेध आंदोलन केले आहे. नंदकिशोर वाढई विदर्भ सरचिटणीस अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या गावापासून या कंपनी चा निषेध करण्यास सुरुवात केली असून संपुर्ण महाराष्ट्रात निषेध आंदोलन अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपुर च्या विरोधात करण्यात येत आहे. दत्तक ग्राम पंचायत सरपंच संघटना यांच्या पाठीशी अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य भक्कम पणे उभी आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
या प्रसंगी तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते अशोक कावळे, जेष्ठ नागरिक धोडु पाटील सुमटकर, मारोती वाढई, क्षावण कुचनकर, सुधाकर पिंगे,अजय गेडाम, प्रभाकर पिंगे,नयन वाढई, विनोद चौधरी, सुधीर वाढई, ज्ञानेश्वर बोढे यासह समस्त गावकरी उपस्थित होते.