मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 15 नोव्हेंबर
महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टॉरंट, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापनांनी, कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानासाठी किमान 2 ते 3 तासांची सवलत देण्यात यावी. मात्र याबाबत संबंधित आस्थापनेस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकार्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने खाजगी कंपन्या, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेर्ल्स यांनी वरीलप्रमाणे तरतुदीचे पालन होईल, याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांनी केले आहे.