गावदेवी जीर्णोद्धार वर्धापन दिनानिमित्त रांजणखार गावात वेशभूषा स्पर्धा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५८९३
अलिबाग: गावदेवी जीर्णोद्धार वर्धापन दिनानिमित्त रांजणखार गावात भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये एकूण सदतीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धा संपूर्णतः खुल्या स्वरूपाची होती. कुणी राजमाता जिजाऊ कुणी शिवशंभो कुणी झाशीची राणी लक्ष्मीबाई , गणपती बाप्पा, कोणी एकविरा माता ,छत्रपती शिवाजी महाराज, भाजीवाली, मच्छी वाली अशा अनेक प्रकारच्या वेशभूषा साकारल्या होत्या स्पर्धा अतिशय रंगतदार आणि चुरशीची झाली. स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून किहिमचे… रायगड भूषण अभिनेता योगेश पवार, वाघ्रण गावचे मूर्तिकार….रायगड भूषण चित्रकार प्रथमेश म्हात्रे, मांडवखर गावचे कलाशिक्षक (मूर्तिकार) केदार सर यांनी स्वीकारली होती परीक्षण अतिशय काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने केले गेले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कुमारी डॉक्टर श्रुती म्हात्रे.. .श्री शंकर तांडव नृत्य. द्वितीय पारितोषिक त्यांचीच मातोश्री सौ नालंदा म्हात्रे..काठेवाडी गंगुबाई पात्र. तृतीय क्रमांक… मानसी पाटील….. एकविरा माता. चतुर्थ क्रमांक काव्या पाटील…. मान मोडलेलं भूत. पाचवा क्रमांक … अंश मात्रे…. श्री विठ्ठल. उत्तेजनार्थ पारितोषिकांमध्ये शुभम म्हात्रे…. एकविरा माता. तर दूर्वा राकेश म्हात्रे… सप्तशृंगी माता. पारितोषिक विजेत्यांनी अशा (वेशभूषा )भूमिका साकारल्या होत्या. आयोजकांकडून विजेत्यांना प्रमाणपत्र ,चषक आणि रोख रक्कम अशी पारितोषिकांची रेलचेल केली होती. भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन, आणि नारळ ओढवून पाहुण्यांच्या आणि ग्रामस्थ मंडळाच्या विश्वस्थानकडून करण्यात आले. संपूर्ण ग्रामस्थांनी पूर्ण सहकार्य दिल्यामुळे गावातील तरुण वर्गाने आयोजित केलेला नाविन्यपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्तम आणि सुरळीत पार पडला. ग्रामस्थांनी आणि पाहुण्यांनी आयोजक तरुण वर्गाचे खूप खूप कौतुक केले.