लोटस पब्लिक स्कूल भंडारा येथे ‘चिल्ड्रेन डे’

200

*लोटस पब्लिक स्कूल भंडारा येथे ‘चिल्ड्रेन डे’

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो 9860020016

भंडारा :- भारताचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस ‘चिल्ड्रेन डे’ म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. लोटस पब्लिक स्कूल, वैशाली नगर, भंडारा येथे सुद्धा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर उपक्रमशील शाळा नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अनुभावातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत असते. या दिवशी ‘फॅन्सि ड्रेस’ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कार्टून पात्र, पक्षी, प्राणी, कीटक, जंक फूड, हेल्थी फूड, कम्यूनिटी हेल्पर यांच्या बद्दल जाणीव व्हावी म्हणून विविध वेशभूषा परिधान करून स्पर्धेचा आनंद घेतला.
प्ले ग्रुप मधून ग्रीथा आरीकर, अद्वैत मने, श्रावी थोटे, प्रत्युश गणविर, नर्सरी मधून अन्वी हटवार, अक्षदा आदमने, भव्या मानकर, नित्या नागोलकर, ताश्वी भिवगडे, रिद्धी डोरले, अभिर मते, अर्श डोंगरे, पार्थ जांगडे, विराज घावडे, विहान घावडे, लकी सारंगपूरे, कियांश उंदीरवाडे, लॅनिश शेबे, वियाना बांडेबूचे, एलकेजी मधून कुणाल चावके, शार्विल चव्हाण, ध्रीती मेश्राम, नमन सोनवाने, शरण्या वंजारी, राघव देशकर, मोशिका साखरवाडे, युविका रामटेके, कियारा धमगाये, यूकेजी मधून भाविन सार्वे, उमंग पचारे, एकांश दमाहे, शार्दुल शहारे, यश्वि खोब्रागडे, अदविका खोब्रागडे, दिशांशी आगाशे, दर्पण बांगडकर यांनी विविध वेशभूषा करून सादरीकरण केले.
यामध्ये प्ले ग्रुप मधून अद्वैत मने प्रथम तर ग्रीथा आरीकर द्वितीय, नर्सरी मधून अक्षदा आदमने प्रथम, नित्या नागोलकर द्वितीय तर अन्वी हटवार तृतीय, एलकेजी मधून नमन सोनवाने प्रथम, ध्रीती मेश्राम द्वितीय तर शार्विल चव्हाण तृतीय व यूकेजी मधून उमंग पचारे प्रथम, अदविका खोब्रागडे द्वितीय तर दिशांशी आगाशे तृतीय असे क्रमांक देण्यात आले.
स्पर्धे आधी लहान मुलांचे चाचा पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर फॅन्सि ड्रेस चा आस्वाद घेण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची उपक्रमशीलता, नाविन्यता, कलागुण, नवीन ज्ञान घेण्याची तयारी इ. गोष्टीना हात घातला गेला. कार्यक्रमाचे संचलन छाया संग्रामे यांनी केले. पालकांनी सुद्धा मुलांना या दिवसासाठी तयार करून सहकार्य केले. अशा रीतीने डॉ. महेशकुमार भैसारे व सौ. अश्विनी भैसारे यांच्या सफल मार्गदर्शनात संगीता पुरी, रुचिता आगरे, नंदिनी खोब्रागडे, रेखा दीदी यांनी ‘चिल्ड्रेन डे’ उत्सव यशस्वी करण्यात अथक परिश्रम घेतले.