खारघर येथे कार थेट नाल्यात कोसळली. वाहन चालक मृत्युमुखी
कृष्णा गायकवाड
प्रतिनिधी
9833534747
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर खारघर येथे एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ती कार थेट पुलावरून २५ फूट खाली थेट नाल्यात कोसळली.
मारुती सुझुकी स्विफ्ट (केए ४१ पी ३४४७) वरील चालक सायन-पनवेल महामार्गावर जात असताना त्यांच्या मागून आलेली क्रेटा कारने मागून धडक दिल्याने ती कार पुलावरून थेट २५ फूट खाली नाल्यात कोसळली. या अपघाताची माहिती मिळताच खारघर पोलिसांचे पथक, वाहतूक शाखा व अग्निशमन दलाने तात्काळ सदर ठिकाणी पोहचून ती कार नाल्यातून बाहेर काढली. या अपघातात कारचालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मृत पावले. या अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.