जुगारात हरला पत्नीला, सहा जणांनी केला बलात्कार. प्रायवेट पार्टमध्येही अॅसिड टाकण्यात आले.
पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. पतीने जुगारामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावले, जुगारात हरल्यावर पतीच्या इशाऱ्यावर पाच ते सहा जणांनी या महिलेवर बलात्कार केला. महिलेने विरोध केल्यावर पतीने अॅसिड फेकून तिला जखमी केले. यादरम्यान, आपल्या प्रायवेट पार्टमध्येही अॅसिड टाकण्यात आले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
बिहार:- बिहारमधील भागलपूर मोजाहिदपूर परिसरात पती-पत्नीच्या नात्याला कलंक लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका पतीने जुगारामध्ये आपल्या पत्नीला पणाला लावले. पत्नीला जुगारात हरल्यावर पतीच्या इशाऱ्यावर पाच ते सहा जणांनी या महिलेवर बलात्कार केला. तसेच संबंधित महिलेने विरोध केल्यावर पतीने अॅसिड फेकून तिला जखमी केले. यादरम्यान, आपल्या प्रायवेट पार्टमध्येही अॅसिड टाकण्यात आले, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.
ही घटना दोन नोव्हेंबर रोजी घडली होती. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा संबंधित महिलेच्या जबाबानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या विवाहाला दहा वर्षे झाली आहेत. मात्र दहा वर्षांत तिला मुलबाळ झालेले नाही. त्यामुळे तिचा पती तिचा छळ करत असे. त्याने आपल्या पत्नीला जुगारात पणाला लावले होते. दरम्यान, वैद्यकीय तपासणीमधील अहवालानंतरच याबाबतची माहिती समोर येणार आहे.
पीडित महिलेने सांगितले की, मी कसाबसा जीव वाचवून जखमी अवस्थेत माहेरी पोहोचले. दरम्यान, या महिलेच्या कुटुंबीयांनी तिला गंभीर अवस्थेत उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर सदर महिलेने स्थानिक भाजपा नेते दीपक सिंह यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी संबंधित महिलेची व्यथा ऐकल्यानंतर याबाबतची माहिती एसएसपी आशिष भारती आणि मोजाहिदपूर पोलीस ठाण्याला दिली. आता मोजाहिदपूर आणि महिला ठाण्याचे पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.
पीडित महिलेसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात तपास करून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील. त्यांना कुठल्याही प्रकारे सोडले जाणार नाही, असे भागलपूरचे सिटी एएसपी पूरन कुमार झा यांनी सांगितले.
काल रात्री पीडित महिलेने दिलेल्या जबाबाच्या आधारावर महिला ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. आता घटनेचा अधिक सखोलपणे तपास केला जात आहे, असे भागलपूरचे एएसपी आशिष भारती यांनी सांगितले.