खाजगीकरणाच्या निषेधार्थ उमेदच्या कर्मचार्‍यांचा मुंबई विधान भवनावर धडक मोर्चा.

मुंबई:- राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे त्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांसाठी उमेदच्या महिलांनी विधान भवनावर धडक मोर्चा.  राज्य सरकारने ‘उमेद’ म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे खाजगीकरण करण्याचा घाट घातला आहे. या खाजगीकरणा विरोधात अभियानातील महाराष्ट्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

‘उमेद’च्या खाजगीकरणाच्या पार्श्वभूमीवर अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्यात आलेल्या आहेत. दि. 10 सप्टेंबरला सेवा समाप्तीचा काढलेला आदेश रद्द करावा, पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, पदभरती व एकूण व्यवस्थापन हे कोणत्याही स्थितीत त्रयस्थ यंत्रणेकडून करण्यात येऊ नये, या मागणीसाठीमहाराष्ट्रातील 34 जिल्ह्य़ातील साडे चार लाख महिला बचत गटातील 50 लाख महिला, गावपातळीवरील महिला कर्मचारी तसेच अभियानाच्या राज्य, जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे कर्मचारी, बचत गट, समुह संसाधन व्यक्ती यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

त्रयस्थ संस्थेकडे दिली पुनर्नियुक्ती
चोवीस तास सेवा देणाऱ्या कर्मचार्‍यांना शासन सीएससी एसपीव्ही या वादग्रस्त त्रयस्थ संस्थेकडून पुनर्नियुक्ती देणार असल्याचे शासनाने जाहीर केले. परिणामी सेवेची हमी उरली नसलेल्या कर्मचार्‍यांची उमेद हरविली आहे.

उमेद अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या महिलांचं आंदोलन, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केलं जात असल्याचा आरोप उमेद या अभियानाच्या अंतर्गत काम करणाऱ्या महिलांकडून विविध मागण्यासाठी मोर्चा काढला गेला. शासनाने काढलेला 10 सप्टेंबरचा अध्यादेश रद्द करा,उमेदचे खाजगीकरण थांबवा, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपलेल्या नियुक्त्या वाढवा, सर्व कर्मचाऱ्यांना वयाच्या 58  वर्षापर्यत सेवा द्या.  विविध मागण्यांसाठी उमेदच्या महिलांनी विधान भवनावर  धडक मोर्चा काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here