धानोली येथील पाटील परिवारांने जोपासली सामाजिक बांधिलकी
वडिलांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात वाटले गरजवंताना ब्लॅंकेट

वडिलांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात वाटले गरजवंताना ब्लॅंकेट
✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲9923296442
कारंजा:- जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आणि ही संतांची शिकवण अंगिकरतांना आणि वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त रंजल्या-गांजल्या ना आवश्यक साहित्य वाटप करण्याचा अनोखा उपक्रम आज कारंजा तालुक्यातील धानोली गावात दौलतराव पाटील यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धानोली येथील बुद्धेश्वर पाटील व चंदु पाटील या दोन्ही बंधूंच्या कडून धानोली, मेटहिरजी, येणीदोडका व राहटी या गावातील गुरुवंत लोकांना 100 ब्लॅंकेट, ब्लाउज पीस व श्रीफळ देऊन वडिलांच्या स्मृतीस मानवंदना वाहण्यात आली.
सदर कार्यक्रमाला आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादारावजी केचे, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता विजय गाखरे, स्वर्गीय वामनराव दिवे चारिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा मार्गदर्शक सुधीरजी दिवे, राष्ट्रवादीचे अभीजितदादा फाळके, निलेश देशमुख, पंचायत समिती उपसभापती जगदीश डोळे, मारोतराव व्यवहारे माजी सभापती, गोपाल मरास्कोल्हे, स्नेहल मानकर, डॉ. पटले, डॉ. शालिनी पटले व बाबाराव सोमकुवर यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत नागझरी सरपंच रमेश लोहकरे, राजू लोहकरे ग्राम पंचायत सदस्य नागझरी, धनराज चारोडे सरपंच मेट हिरजी, समाजिक कार्यकर्ते दामोजी भाकरे, महादेव ठाकरे, प्रफुल पोटे, दिलीप जसुतकर, शुभम उगेमुगे, शिरीष भांगे, पंकज काळे, राजू किनकर, लीलाधर दिग्रसे, कमलेश धोटे, भागवत पाटील माजी उपसरपंच धानोली, परिक्षेत्र अधिकारी पाटील व प्रवीण डेहनकर,किशोर पाटील,कपिल पाटील, राजू सोमकुवर, अमोल पाटील, नारायण पाटील, भुषण गजभिये, भगवान लाटकर, विनोद वडूले, मुख्याध्यापक विलास गजभिये, डॉ. देवचंद सोमकुवर आदी मान्यवर उपस्थित होते.