गॅस दरवाढीने ग्रामीण महिला त्रस्त

62

गॅस दरवाढीने ग्रामीण महिला त्रस्त

गॅस दरवाढीने ग्रामीण महिला त्रस्त
गॅस दरवाढीने ग्रामीण महिला त्रस्त

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
7620512045

लाखणी:-तालुक्यातील अनेक गावांत शासनाच्या योजनेतून गॅस वितरण करण्यात आले आहे. विविध योजनेतून गॅस वितरण केले, परंतु गॅस सिलिंडरच्या किमती एक हजाराच्या आसपास पोहचल्या आहेत. गॅसच्या किमती वाढल्यामुळे महिन्याला एक हजार रुपये आणायचे कुठून ? असा प्रश्न गोरगरीब जनतेला सतावत आहे. घरोघरी मातीच्या चुली, अशी म्हण पुन्हा दिसू लागली आहे. सिलिंडरमुळे नवीन पिढीला चुलीचा विसर पडला होता. मात्र, गॅसची सातत्याने दरवाढ होत असल्याने पुन्हा ग्रामीण भागात धूर निघत आहे धूर मुक्त गाव योजनेचा खेळखंडोबा झाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. ग्रामीण भागात गॅस सिलिंडरचा वापर वाढला होता. घरोघरी चुली पेटवल्या जात नाहीत तर काही घरी चुली हद्दपार झाल्या होत्या. ग्रामीण भागात महिला व पुरुष वर्षभरापासून परिसरातून सरपण जमा करत होते गॅस मिळाल्याने ते ही बंद झाले पण पुन्हा अजून सरपण गोळा करण्याची वेळ आली आहे. स्वयंपाक गॅस वर तर अंघोळी करिता लागणारे गरम पाणी गॅसवरच गरम करण्यात येत होते. ग्रामीण भागातील शेतकरी मजूर कुटुंबीयांची आर्थिक बजेट विज बिल आणि सिलेंडर मुळे पूर्णत गरिबांचे बजेट कोलमडले आहे. सततची नापिकी व कोरोनामुळे अनेक कुटुंबांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. रोजगारासाठी भटकंती होत असून विविध साहित्यांची दरवाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. वेतन कमी असल्याने नागरिकांना महागडा गॅस परवडणार काय ? असे असताना महागाई गगनाला भिडत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडर घेणे अनेक कुटुंबीयांना अशक्य झाले आहे. येत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावर सरपणाची मोळी दिसणार आहे. महिलांसोबत पुरुषही परिसरातून लाकडे गोळा करून सायकलवरून सरपण आणत असल्याचे चित्र ग्रामीणमध्ये दिसून येत आहे.