श्री कालभैरव मंदिराचा जिर्णोद्धार , मूर्ती प्राणप्रतिष्ठा ,आणि कलश रोहन कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा…
रायगड माणगाव
हिरामण गोरेगावकर
माणगांव : -माणगाव तालुक्यातील नावलौकिक आदर्श गाव सुरव तर्फे तळे गावातील श्री काळ भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलश रोहन कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. माणगाव तालुक्यातील सुरव गाव हे एक नावलौकिक आणि आदर्श गाव म्हणून ओळख असलेल गाव आहे या गावातील ग्रामदेवता श्री काळ भैरवनाथ मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम नुकताच पार पडला या गावतील ग्रामदैवत मंदिर हे खूप वर्ष पूर्वीच असल्याने बरेच वर्ष हे काम होऊ न शकल्याने हे मंदिर जुन्या पद्धतीचे होते .पण अखेर गावातील सर्व ग्रामस्थांनी मग ते मुंबईत राहणारे असो किंवा गावात राहणारे असो सगळ्यांनी विचार करून पुढाकार घेऊन लोकवर्गणीतून तसेच देणगी जमा करून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या माणसं दाखवत हे काम होऊ शकले आणि अखेर तारीख निश्चित केली दि . 13 डिसेंबर ते 15 डिसेंबर असा तीन दिवसीय कार्यक्रम जाहीर झाला मुख्य म्हणजे गावातील लहान थोरा सहित वृद्धा पर्यंत सर्वच लोकांनी तसेच महिलांनी डोक्यावर कलश डोक्यावर घेत सलग दोन दिवस गावातून दिंडीत सहभागी होत मोठ्या उत्साहात आनंदात हिरहिरीने या कार्यक्रमात सहभागी होऊन पार पडला , प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने खारीचा वाटा उचलत अनेक प्रकारे मदत केली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून *नामदार श्री सुनील तटकरे साहेब , अनिकेत तटकरे , तसेच आदिती ताई तटकरे* हे राहणार होते परंतु अधिवेशन चालू असल्याने हे तीनही प्रमुख पाहुणे उपस्थित न राहिल्याने सदर कार्यक्रमास श्री सुनीलजी तटकरे यांच्या पत्नी *सौ वर्धा तटकरे* यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम पार पडला त्यांच्या सोबत तालुक्यातील अनेक मान्यवर श्री महादेव जी बक्कम साहेब , श्री शैलेश भोनकर , संगीता ताई बक्कम , नामदेव जी कासारे माणगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष ज्ञानदेव जी पवार अशा अनेक मान्यवरानी कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वढवली आणि हा तीन दिवसीय कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.