चंदूबाबा स्टेडियम वाचविण्याकरिता नगर विकास संघर्ष समिती भीक मांगो आंदोलन करणार

52
चंदूबाबा स्टेडियम वाचविण्याकरिता नगर विकास संघर्ष समिती भीक मांगो आंदोलन करणार

चंदूबाबा स्टेडियम वाचविण्याकरिता नगर विकास संघर्ष समिती भीक मांगो आंदोलन करणार

चंदूबाबा स्टेडियम वाचविण्याकरिता नगर विकास संघर्ष समिती भीक मांगो आंदोलन करणार

भवन लिल्हारे मो.नं.9373472847

भंडारा : (मोहाडी ) भंडारा जिल्ह्यातील तालुका मोहाडी येथील चंदूबाबा स्टेडियमवर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असून, नगरपंचायतचे मुख्यधिकारी व तहसीलदार मोहाडीच्या वतीने काहीच हालचाल करीत नसल्याने, एवढी मोठी शासकीय जागा गिळंकृत होणार आहे. मोहाडी क्रीडांगण बचाव समितीने पुढाकार घेऊन सदर जागा अतिक्रमणातून मुक्त केली होती. पण मुख्याधिकारी नगरपंचायत मोहाडी व तहसीलदार मोहाडी यांच्या अनास्थेमुळे क्रीडांगनाची जागा पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात गिळंकृत होण्याची शक्यता आहे.
अतिक्रमण धारक चंदूबाबा स्टेडियमच्या शासकीय जागेवर दिवसेंदिवस अतिक्रमण करीतच जात आहे व पटांगणावर रनिंग मारणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना शिवीगाळ देतो व दमदाटी करतो. पण अधिकारी मात्र झोपेचे सोंग घेऊन चुप्पी साधुन बसले आहेत.
अतिक्रमण धारक कोर्टात चकरा मारतो. पण कोणताही अधिकारी कोर्टात उपस्थित राहत नाही. मागे सुध्दा अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे, अतिक्रमण धारक कोर्टात जिंकला होता. पण क्रीडांगण बचाव समितीने किल्ला लढविल्यामुळे प्रकरण जिंकून अतिक्रमण मुक्त करण्यात आले. पण पुन्हा अतिक्रमण धारक कोर्टात गेला व अतिक्रमण वाढवितच जात आहे , पण अधिकारी मात्र शासनाची बाजू कोर्टात मांडण्यात दिरंगाई करीत आहेत. क्रीडांणाची जागा अतिक्रमणापासून वाचविण्यासाठी क्रीडांगण बचाव समितीच्या सोबतीने नगर विकास संघर्ष समिती पुढाकार घेणार असून, वेळ पडल्यास कोर्टात जाण्यासाठी आर्थिक मदत जमा करण्याकरिता भिक मांगो आंदोलन करणार असल्याचे नगर विकास संघर्ष समितीचे खुशाल कोसरे, बबलू सैय्यद, पुरूषोत्तम पात्रे, अनिल न्यायखोर व पदाधिकऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.