पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने संपणार ऑटोरिक्षा चालक – मालकांचाची समस्या •पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅंड येथे ८३ लक्ष ९३ हजार रू. निधीचे टीनाचे शेड मंजूर •ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने आभार मानले

57
पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने संपणार ऑटोरिक्षा चालक - मालकांचाची समस्या •पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅंड येथे ८३ लक्ष ९३ हजार रू. निधीचे टीनाचे शेड मंजूर •ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने आभार मानले

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने संपणार ऑटोरिक्षा चालक – मालकांचाची समस्या

•पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅंड येथे ८३ लक्ष ९३ हजार रू. निधीचे टीनाचे शेड मंजूर
•ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने आभार मानले

पालकमंत्री मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने संपणार ऑटोरिक्षा चालक - मालकांचाची समस्या •पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅंड येथे ८३ लक्ष ९३ हजार रू. निधीचे टीनाचे शेड मंजूर •ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेने आभार मानले

*🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा*
📱 8830857351

चंद्रपूर : 15 डिसेंबर
महाराष्‍ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे प्रधान डाकघर, पाण्‍याची टाकी स्‍टॅंड व मुख्‍य बस स्‍टॅंड ऑटो‍रिक्षा स्‍टॅंडवर ऑटो उभे करण्‍याकरिता स्‍थायी स्‍वरुपाचे स्‍टॅंड ऑटोरिक्षा चालकांना उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे पत्रव्‍यवहार करुन करण्‍यात आली. त्‍यामुळे सुधीर मुनगंटीवार यांनी महानगरपालिका आयुक्‍त यांना सुचना करुन पाण्‍याची टाकी व बस स्‍टॅंड येथे त्‍वरित टिनाचे शेड उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे असे निर्देश दिले. त्‍यामुळे नगरोत्‍थान निधी अंतर्गत रु. ८३ लाख ९३ हजार निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. त्‍याबद्दल महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, जिल्‍हा सचिव सुनिल धंदरे, जिल्‍हा संघटन प्रमुख विनोद चन्‍ने, कुंदन रायपुरे, दिलीप ढवळे, परशुराम तुराडे, अंकुश कौराते, किशोर वाटेकर, वासुदेव कुबडे, महेश ढेकरे, जनार्धन गुंजेकर, अरविंद चौरे, राकेश पवार, बबन टोंगे, अविनाश उकेकर, रमेश वझे, बंडू भगत तसेच चंद्रपूर शहरातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.