श्री रविप्रभा मित्र संस्था व म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर

श्री रविप्रभा मित्र संस्था व म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर

श्री रविप्रभा मित्र संस्था व म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर

नंदकुमार चांदोरकर
माणगाव तालुका प्रतिनिधी
8983248048

माणगाव : म्हसळा शहरात श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड व म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल यांचे यशस्वी द्वितीय वर्धापन दिनानिमित्त या मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्याचे योजले आहे, या नेत्र तपासणी शिबिरांची जबाबदारी संस्थेचे सदस्य समीर लांजेकर, सुजित काते, श्रीकांत बिरवाडकर,किरण मोरे, नितीन रिकामे, संतोष घडशी यांनी उत्तम प्रकारे पार पाडुन संपूर्ण म्हसळा तालुक्यात या शिबिराच्या संदर्भात माहिती देण्यात आली, आम्ही म्हसळा तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की जास्तीत जास्त या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा , हे शिबिर घन्सार कॉम्प्लेक्स, येथे म्हसळा डोळ्यांचे हॉस्पिटल येथे आयोजित केले व दिनांक २४ डिसेंबर वार रविवार रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत ठेवण्यात आले आहे अशी सविस्तर माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांनी आमच्या प्रतिनिधी यांना सांगितली.व रिक्षा युनियन संघटना, हॉटेल संघटना, विविध संस्था, मंडळ, शासकीय, निमशासकीय अशा सर्व ठिकाणी शिबिराची माहिती सांगण्यात आली आहे असे देखील लाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here