कमी वयात जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रसाद गायकवाड
रायगड जिल्ह्यातील झंझावात आणि तरुणांचे आयकॉन म्हणून ओळखले जाणारे अवलिया, समाजसेवे बरोबरच इतर क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे दिलदार व्यक्तिमत्त्व, सर्व सामान्य जनतेला दिलेला शब्द पाळणारा आणि आपली तत्वे जपणारा माणूस म्हणजे प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड… त्याचप्रमाणे गरिबीची जाण असणारा, राजकीय मतभेद विसरून सर्वांना मदत करणारा सर्वसामान्य जनतेचा कैवारी बनले आहेत.

अलिबाग तालुक्यातील चोंढीसारख्या छोट्याशा गावातील प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांचा जन्म शेतकरी परिवारात १६ डिसें. रोजी झाला आहे. त्यांच्या परिवारात एक भाऊ आणि एक बहीण आणि आई-वडील आहेत.पिंट्या गायकवाड यांनी त्यांना समज आल्यापासून जेवढी शक्य मदत करण्यास सुरुवात केली. आज त्यांनी त्यांच्या संपर्कात असणारे मुंबईतील धनाढ्य व्यक्ती यांच्या सहकायनि चोंढी सहित आजूबाजूला असणाऱ्या गोरगरीब जनतेसाठी सुसज्ज अशी कार्डियाक रुग्णवाहिका मिळवली असून त्या रुग्णवाहिकेचा वापर गोरगरीब जनतेसाठी विनामूल्य केले जात आहे. आजपर्यंत पिंट्या गायकवाड यांनी सामाजिक दायित्व ओळखून अनेक सामाजिक कार्य हाती घेऊन त्याचा फायदा गोरगरीब जनतेला कशाप्रकारे होईल? यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे.

विकासासाठी योगदानाला व संघर्षाला तेथूनच सुरुवात झाली. शालेय जीवनापासूनच गोरगरिबांची बाजू कायम उचलून धरून त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत झटत राहणे हेच आयुष्यातील ध्येय आणि २४ तास सामान्य व गरीब जनता केंद्रस्थानी ठेवून झटणाऱ्या चोंढी या गावातील पिंट्या गायकवाड यांच्यावर मराठा समाजाने अलिबाग तालुका मराठा समाज उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचबरोबर गावाच्या विकासासाठी सढळ हाताने निधी मिळत असल्याने गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी गायकवाड हे दिवस-रात्र एक करीत आहेत. गोरगरिबांच्या आणि गावाच्या हितासाठी कायम झटणाऱ्या पिंट्या गायकवाड यांची गोरगरीब जनतेचा ‘कैवारी’ म्हणून अलिबाग तालुक्यात ओळख आहे.

आपले राजकीय गुरु माजी आमदार स्वर्गीय मधूशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने व स्वकर्तृत्वाने जनमाणसात मिसळून ते आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांना रायगड जिल्हातील अनेक नेत्यांची साथ मिळते. त्यांचे रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे, महिला विकास व बालकल्याण खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शेकाप, मनसे आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे चांगले सलोख्याचे संबंध आहेत.

गावात जेव्हा नैसर्गिक संकट आली तेव्हा आपल्या परीने इतकी मदत होईल तिथे करत आहेत. नैसर्गिक आपत्ती मध्ये पिंट्याशेठ नेहमी पुढे असतात.कुठे झाड पडले,सर्प आला तर पहिले फोन पिंट्याशेठ यांना करतात कारण त्यांना माहीत असते की वेळेवर मदत हीच व्यक्ती करू शकते असे ओळखच परिसरात निर्माण झाली आहे.आजही अनेक गरजू लोकांना मदतीचा हात पुढे करताना पिंट्या शेठ जातपात पाहत नाही. फक्त व्यवसायातच अडकून न राहता आपली लहानपणी राहिलेले छंद देखील ते आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.ते बैलगाडी शर्यत प्रेमी आहेत. त्यासाठी ते आपल्या वाढदिवशी बैलगाडी शर्यतीचे आयोजन नेहमी करतात. त्याच बरोबर कबड्डी, हॉलीबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, गायन संगीत स्पर्धा यांचे भव्य आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

हे करीत असताना समाजाचे आपल्यावर उपकार आहेत. या भावनेतून परिसरात मेडिकल कॅम्प, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शिबिर यांचे आयोजन करीत असतात.


आज पिंट्याशेठ त्यांच्याकडे खूप कमी वयात कर्तुत्व, नावलौकिक, पैसा, माणसाचा गोतावळा सर्व काय आहे. हे सर्व त्यांनी स्वकष्टाने व आपल्या मनमिळावू स्वभावाने कमविले आहे. आपल्याला मिळालेल्या यशाने पिंट्याशेठ च्या स्वभावात किंचितही बदल झालेले नाही. आई-वडिलांच्या संस्कारामुळे चांगले कर्म करत असल्याचे दिसत आहेत. आपल्या जे मिळाले त्यातील काही भाग जनसेवेसाठी खर्च करायचा असा मनोमन निश्चय त्यांनी सुरुवातीपासूनच केला आहे. त्यामुळे गरजवंतासाठी त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो. अश्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणारा तरुणाचा आयकॉन,समाज सेवेबरोबरच इतर क्षेत्रात ठसा उमटविणारा दिलदार व्यक्तिमत्त्व,सर्व सामान्य जनतेला दिलेला शब्द पाळणारा आणि आपली तत्वे पाळणारा ,गरिबीची जाण असणारा माझा मित्र प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांना दैनिक मिडिया वार्ता न्यूज परिवारा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
– अँड. रत्नाकर पाटील(पत्रकार)









