मिडीया वार्ता न्यूज

मुंबई : उपनगरीय रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे. बुधवारी दादर रेल्वे स्थानकात दोन कट्टे हस्तगत करण्यात आले. दादर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ आणि ८ वर हा प्रकार घडला. रेल्वे पोलीस दला (आरपीएफ)च्या जवानांच्या सतर्कतेमुळे त्या संबंधितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  दादर स्थानकात बुधवारी पंजाब मेलमधून आरोपी उतरले होते. त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे आरपीएफच्या जवानांनी त्यांच्याकडे असलेले सामान स्कॅ न करण्यास सांगितले. त्या वेळी स्कनिंग मशिनमध्ये दोन गावठी कट्टे आणि २२ राऊंड असल्याचे निदर्शनास आले. यामधील रवींद्र पवार या संशयित आरोपीला पकडण्यात आले. तर पळून गेलेल्या आरोपींपैकी देखील एकाला अटक करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. त्यांच्यावर •ाारतीय शस्त्रकायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे कट्टे नेमके कशासाठी आणले हे अद्यापि स्पष्ट झाले नसून  या प्रकरणी लोहमार्ग पोलीस अधिक तसाप करत आहेत.   दरम्यान, गरुुवारी सरुक्षस्ोाठी मध्य रेल्वव्ोर विशष्ो सरुक्षा माहेीम लाहेमागर् पोलीस आणि आरपीएफन ेहाती घत्ोली हात्ोी. यामध्य ेतीन टप्प्याम्ांध्य ेतपासणी करण्यात आली. त्यानस्ुाार सीएसटी त ेकुलार्, कुलार् त ेमब्ुाां्र आणि कल्याण ते कजतर््ा दरम्यान लाकेल व स्थानकांमध्ये दिवस•ार तपासणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here