मिडीया वार्ता न्यूज
नालासोपारा : एअर इंडियाच्या एका माजी पर्यवेक्षकाने टोटाळे तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विरार पूर्वेकडील वसई-विरार महानगरपालिकेच्या टोटाळे तलावावरील स्कायवॉकवरून बाबू नानजी गोहिल (७३) यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी गुजराती •ााषेत एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्यांची मुलं व नातेवाईकांनी ७ लाख रुपये घेतले होते़ मात्र, ते देत नव्हते व मानसिक छळ करत असल्याचे त्यात लिहिले आहे. या प्रकरणी अशोक गोहिल, •ारत गोहिल, सोनी गोहिल, सागर गोहिल, रुबीबेन सोळंकी, बच्चू•ााई प्रेमाजी वाघाल यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, त्याच्या नातेवाईकांनी बाबू गोहिल हे सतत आजारी पडत त्यामुळे ते चिडचिडे झाले होते़ त्यामुळे त्यांनी डिप्रेशनमध्ये जाऊन हे कृत्य केले असावे, असे सांगितले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्याचे वपोनि़ युनूस शेख तपास करत आहेत.