मिडीया वार्ता न्यूज

आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवा त

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या तिसºया संपूर्णत: •ाुयारी मेट्रो मार्गाच्या आरे जंगलातील कारडेपोच्या कामासाठी दिल्लीस्थित मेसर्स सॅम बुएटवेल प्रा़ लिमिटेड  या कंत्राटदार कंपनीची निवड करून काम देण्यात आले आहे़ या कंपनीकडून आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार असून, पुढील अडीच वर्षांत कंपनीकडून काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याची माहिती एमएमआरसीचे प्रकल्प संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक एस़ के़ गुप्ता यांनी गुरुवारी ही माहिती दिली़ या कंत्राटदार कंपनीने कारडेपोचे बांधकाम, मेट्रो स्थानक, कामासाठी वर्कशॉप इमारत, वाहन ये-जा करण्यासाठी मरोळ, मरोळी रस्त्यावरील अंडरपासचे बांधकाम, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये मागवलेल्या निविदेनुसार काम करणे अपेक्षित आहे़ मेट्रो कारडेपोसाठी ३५ रेक्सच्या ८ ट्रेन २५ हेक्टर जागेत कार्यरत राहणार आहेत़ या संपूर्ण प्रकल्पाची किंमत ३२८ कोटी असून मे़ सॅम इंडिया बुएटवेल

या कंपनीला दिल्ली व लखनौ मेट्रोच्या कामाचा अनु•ाव असल्याची माहिती एस़ के़ गुप्ता यांनी दिली़ कारडेपोच्या कामाचे कंत्राट सोपवताना आम्हाला आनंद होत असून, या कामासाठी

आवश्यक तांत्रिक बाबी लवकरच मुंबईत दाखल होणार असल्याचेही गुप्ता यांनी स्पष्ट केले़ कंत्राटदाराने कारडेपोमध्ये मेट्रो रोलिंग स्टॉकसाठी बांधकाम तसेच बॉण्ड्री वॉल, स्ट्राम वॉटर ड्रेन्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली, मलनिस्सारण प्रणाली, वाहन अंडरपास, अशा अनेक

लहान-मोठ्या कामांचा समावेश आहे़  तसेच झाडांची छाटणी व पुनर्लागवड यांचाही समावेश कामामध्ये करण्यात आला आहे़ आजपासून कंत्राटदाराचे काम तांत्रिकदृष्ट्या सुरू झाले असून, प्रत्यक्ष कामाला आॅक्टोबरपासून सुरुवात करण्यात येणार आहे़ आॅक्टोबरपासून प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात कारडेपोच्या अंतर्गत रचनेत बदल कुलाबा-वांद्रे-सीप्झ या तिसºया संपूर्णत: •ाुयारी मेट्रो मार्गासाठी आवश्यक कारडेपोच्या अंतर्गत रचनेत बदल करण्यात आला असून ३० हेक्टर जागेपैकी २२ हेक्टर जागेवर बांधकाम करण्यात येणार असल्याचे सांगत गुप्ता यांनी नव्या सुधारित आराखड्यात १०७४ झाडे छाटणीपासून वाचवण्यात आल्याची माहिती दिली़ मात्र, हा सुधारित आराखडा वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरीच्या प्रतीक्षेत असून जर मान्यता मिळाली, तरच या झाडांचा बचाव करण्यात येणे शक्य असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले़.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here