मिडीया वार्ता न्यूज

पनवले : पनवेल नजीकच्या माची प्रबळ गडावर ट्रेकिंगसाठी गेलेले तिघेजण सोमवारी रात्रीच्या अंधारात •ारकटल्याने त्यांना स्थानिक आदिवासी व ग्रामस्थांच्या मदतीने पनवेल तालुका पोलिसांनी सुखरूप खाली आणले. मुंबई येथील उच्चशिक्षित नयन नंदकुमार सिन्हा (२७, रा. अंधेरी), अविनाश कुमार (२५, रा. ठाणे), त्याची बहीण दिव्याकुमारी (२६, रा. ऐरोली) या तिघा जणांनी तालुक्यातील वाजे गाव येथील सलमान खानच्या फार्महाऊसच्या मागील बाजूला असलेल्या माची प्रबळ गडावर ट्रेकिंगसाठी सोमवारी दुपारी सुरुवात केली. ते दरमजल करत गडावर ट्रेकिंग करत होते. किर्र जंगलात व •ारपावसात तिघे निसर्गासह ट्रेकिंगचा आनंद लुटत होते. परंतु सायंकाळ होताच काळोख दाटून आला व सगळीकडे अंधार पसरला. त्यात मुसळधार पावसाची •ार पडल्याने आपण जंगलात •ारकटत चालल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या वेळी त्यांनी मोबाइलवरून नवी मुंबई पोलीस कंट्रोलशी संपर्क साधला. गडावर वाट चुकल्याची माहिती पोलिसांना दिली. तत्काळ कंट्रोलने पनवेल तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शालीग्राम, पोलीस नाईक संदेश म्हात्रे, सरोदे, कोळसे यांच्या पथकाने लगेच स्थानिक ग्रामस्थांशी व आदिवासी बांधवांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी तीन पथके तयार केली. रात्रीच्या वेळी •ारपावसात तिघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here