यवतमाळ जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 83 टक्के मतदान.
यवतमाळ जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींच्या 8 हजार 101 जगांसाठी 17 हजार 117 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात तब्बल 83.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
यवतमाळ:- जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतींच्या 8 हजार 101 जगांसाठी 17 हजार 117 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात तब्बल 83.15 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून सायंकाळपर्यंत मतदानासाठी अनेक केंद्रांवर रांग लागली होती. अपवाद वगळता सर्वत्र मतदान पार पडले.
जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार होती. यातील 55 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. यामुळे 925 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानवेरीला पार पडली. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराने आपली ताकद पणाला लावली होती. एक मत खेचून आणण्याचा प्रयत्न केला जात होता. यामुळे सायंकाळपर्यंत 83.15 टक्के मतदान झाले.
3 हजार 71 प्रभांगामध्ये 8 हजार 801 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी 10 हजार 500 कर्मचारी तैनात होते. निवडणुकीमध्ये कोरोनाग्रस्त मतदारांसाठी अर्धा तासांचा अवधी आरक्षित ठेवण्यात आला होता. याशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मतदान केंद्रांवर हँड सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्स बंधनकारक करण्यात आले होते. या नियमाचे काही ठिकाणी पालन झाले, तर काही ठिकाणी उल्लंघन झाले.
काही मतदान केंद्रांवर मतदारांची नावे चुकल्याच्या तक्रारी यावेळी पुढे आल्या . संवेदनशील केंद्रांवर प्रशासनाचे पूर्ण लक्ष होते. या ठिकाणाचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आर्णी 66, बाभूळगाव 50, दारव्हा 73, दिग्रस 46, घाटंजी 49, कळंब 56, केळापूर 40, महागाव 71, मारेगाव 30, नेर 49, पुसद 98, राळेगाव 46, उमरखेड 75, वणी 74, यवतमाळ 66, तर झरी तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. या निवडणुकीमध्ये महिलांची संख्या अधिक होती. काेरोनानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. विकासाच्या मुद्यावर मतदान पार पडले.