मुंबई 272 कोटीच्या जीएसटीची चोरी; कांदिवलीच्या व्यापाऱयाला अटक.

49

मुंबई 272 कोटीच्या जीएसटीची चोरी; कांदिवलीच्या व्यापाऱयाला अटक.

गुणवंत कांबळे

मुंबई:- जीएसटीची तब्बल 272 कोटी रुपयांची खोटी बिले दाखवून फसवणूक करणाऱया व्यापाऱयाला महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाने अटक केली आहे. जीएसटीची चोरी करणाऱयांच्या विरोधात उघडलेली अलिकडच्या काळातील ही तिसरी मोठी कारवाई आहे. विलेपार्ले पूर्व येथील अनुज गुप्ता या व्यापाऱयाने पाच कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू का सेवा प्रत्यक्षात अंतर्भूत नसताना सुमारे 272 कोटी रुपयांची खोटय़ा बिलांद्वारे खरेदी दाखवली आणि तब्बल 31 कोटींहून अधिक रुपयांचे ‘इनपूट टॅक्स क्रेडीट’ घेतले.

हा प्रकार उघडकीस येताच राज्य कर सहआयुक्त संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त विनोद देसाई, सहाय्यक राज्यकर आयुक्त मिलिंद पवार, आशिष कापडणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. करबुडव्या व्यापाऱयांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्यकर विभागाचे आयुक्त संजीव कुमार यांनी दिला आहे.