विसापूर क्रिडा संकुलाच्या थकित विजबिलाचा भरणा करण्यासाठी भिक मांगो आंदोलन
• भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे लक्षवेधी आंदोलन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
विसापूर : 16 जानेवारी
मागील महिन्यात विसापूर क्रिडा संकुल येथे मोठ्या थाटामाटात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी करोडो रुपयाचा खर्च करण्यात आला होता आणि त्यापेक्षाही जास्त खर्च बॅनर बाजीवर पोस्टर बाजीवर करण्यात आला होता. बॅनर होर्डिंग पोस्टर, ऑटो बॅनर लावण्यात आले होते. चौका चौकात आणि रस्ता रस्त्यावर जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली पण, नोव्हेंबर महिन्याचे विसापूर स्टेडियम चे दोन लाखाच्या वरील बिल भरायला सुद्धा सरकारकडे पैसे नाहीत म्हणून महावितरण ने विसापूर स्टेडियमचा वीज पुरवठा सोमवारी,15 जानेवारीला खंडीत करण्यात आला. करोडो रुपये खर्च करून थाटामाटात घेण्यात आलेल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये बॅनरबाजी पोस्टरबाजी करत प्रचार करण्यात आला आणि आता सरकारकडे दोन लाखाचे वीज बिल भरायला पैसे नाहीत म्हणून भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे चंद्रपूरच्या जिल्हा स्टेडियमवर पैसे गोळा करण्यासाठी अनोखे भीक मांगो आंदोलन करण्यात आले आहे.