कर्जत खालापूर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का
युवानेते संदीप जाधव करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश?
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
कर्जत: नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असता या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळत एक अति सत्ता मिळवण्यात यश आल्याने सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असता पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महायुतीने पुन्हा एकदा मोर्चे बांधणी सुरुवात केली असता अनेकांचा कल हा महायुतीकडे प्रभावित होत असताना चौक परिसरातील युवा नेते समजले जाणारे संदीप जाधव यांनी माजी आमदार तथा भाजपाचे नेते सुरेशभाऊ लाड, भाजपचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याने ठाकरे गट शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
खालापुर तालुक्यातील ग्रामीण कलोते परिसरात युवानेते संदीप जाधव यांचा दबदबा असल्याने त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा भाजपाला पुढील काळात मजबुती करण्यासाठी फायद्याचा ठरणार असल्याचे मत राजकीय जानकार व्यक्त करत आहेत.
उरण विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या खलापुर तालुक्यातील गावांमधील युवा नेते संदीप जाधव आपले असंख्य सहकार्यांना सोबत घेत भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असता जाधव वाढता जनसंपर्क पाहता या परिसरात भाजपला नव्या नेतृत्वाने उभारी मिळणारा असून संदीप जाधव आपल्या समवेत कोण कोणत्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश करणारा आहेत याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिला आहे.