नशेबाज प्रेमीकेसाठी प्रियकर करायचा चोरी, चोरीचे 13 मोबाईल केले जप्त.
राज शिर्के
मुंबई:- व्यसनाधीन नसेबाज प्रेमीकेचे व्यसनाचे चोचले पुरवण्यासाठी रात्रीच्या वेळेस चोऱ्या करणाऱ्याला प्रेमीला आरे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहे.
प्राप्त माहीतीनुसार आरोपी प्रेमी अजय पांडियन तेवर असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 13 चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. अजय हा आरे कॉलनी 7 नंबरमध्ये राहतो. तर त्याची प्रेमीका गोरेगाव परिसरात राहते. ते दोघेही नशेच्या आहारी गेले आहेत.
अजय हा स्वतःला आणि प्रेमीकेच्या नशा करण्यासाठी चोऱ्या करतो. त्याने काही दिवसांपूर्वी गोरेगावच्या चित्रनगरी येथील गेट नंबर 1 येथील दुकानात चोरी केली होती. चोरीप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्याच्या तपास आरे पोलीस करत होते. तपासा दरम्यान पोलिसांनी अजयला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरी केल्यावर मिळणाऱ्या पैशातून तो स्वतः आणि त्याची प्रेयसी हे दोघे नशा करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. चोरीच्या गुन्ह्यात अजयला अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्याने आणखी गुन्हे केले आहेत का, याचा तपास आरे पोलीस करत आहेत.