मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन व सामुहिक हवन कार्य

58

मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन व सामुहिक हवन कार्य

मानव धर्माचे भव्य सेवक सम्मेलन व सामुहिक हवन कार्य

✍ भवन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका पत्रकार
📱८७९९८४०८३८📱
📱८३०८७२६८५५📱

मोहाडी :- ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ, मोहाडी अंतर्गत सर्व रामपूर वासी सेवकांच्या वतीने दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ सोमवार रोजी मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कृपेने दुःखी व गरीब मानवास भगवत प्राप्तीचा परिचय करुन देणारे व सर्व वाईट व्यसनातून व अंधश्रद्धा यातुन मुक्त करुन सुखमय जिवन जगविणारे मानव धर्माचे प्रचार, प्रसार निमित्त सामुहिक हवन कार्य व सेवक सम्मेलन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, करीता या मानव धर्माच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थती प्रार्थनीय आहे.
कार्यक्रमाचे आयोजक
ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ रामपूर चे अध्यक्ष श्री अंबरजी मालाधारी,उपाध्यक्ष श्री गंगारामजी सव्वालाखे, सचिव गंगाधरजी सव्वालाखे, व संपुर्ण सेवक सेविका यांच्या माध्यमातून आपण आपल्या सेवक संमेलन साजरा करण्यासाठी सकाळी ५:०० वाजता ग्राम स्वच्छता अभियान,८:३० वाजता सामुहिक हवनकार्य,९:३० वाजता शोभायात्रा हनुमान झाकी,दुपारी १२:३० वाजता दिप प्रज्वलन, दुपारी १:००ते १:३० वा. पाहुण्यांचे स्वागत करण्यात येईल,

ज्ञान पररस मररस योगी परिस नावाच्या वस्तूला लोखंडाचा स्पर्श झाल्यावर ते लोखंड सोने बनते, त्याचप्रमाणे ज्ञान हे परिसा सारखे आहे,या ज्ञानाला जो स्पर्श करील त्याचे सोने होईल, म्हणजे तो महांग्यानी होतो, परंतु मानवी जीवनात दैवीशक्ती करीता मनाची एकाग्रता,एक चित्त,एक लक्ष,एक भगवान याची आवश्यकता आहे,तेच दैवी शक्ती चे उगमस्थान आहे, बाबांनी दिलेल्या चार तत्व, तीन शब्द, पाच नियम,या आधारावर अध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार व प्रचारिका सौ.लताबाई दिलीपजी बुरडे, यांच्या मुखातून बाहेर पडणारे मानव धर्माची शिकवण, मी कोण? आणि परमेश्वरी संदेश, प्रार्थनेचे महत्त्व काय? चर्चा बैठक म्हणजे काय? कार्यकर्ता काय ? आणि मी कोण? या आधारावर अध्यात्मिक गुरु प्रवचन होईल.

या कार्यक्रमात सहभागी झालेले ब. उ. प. पुज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी चे अध्यक्ष श्री. यशवंतरावजी म. ढबाले हे राहतील, व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले अध्यात्मिक प्रमुख मानव धर्म प्रचार प्रसारिका सौ. लताबाई दि. बुरडे हे राहतील, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे श्री. गुलाबजी सव्वालाखे (सरपंच) मांडेसर श्री. रोशनजी लिल्हारे (उपसरपंच) जिल्हा परिषद सदस्य श्री. आनंदजी मलेवार, पंचायत समिती सदस्य श्री. बनाभाऊ सव्वालाखे, पोलीस पाटील श्री. महेशजी सव्वालाखे, त. मु. अध्यक्ष श्री. दुर्योधनजी अटराहे,हे राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, यावेळी त्यांनी आपल्या सेवक मंडळ मोहाडी अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी व सेवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा अशी अपील आयोजक यांनी केली आहे.