नागभिड नगरपरिषद मधे शिवसेनेचा झंझावात प्रभाग क्र.8 नागभीड ( खैरी चक ) येथील 39 महिला आणि पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश व महिला आघाडी शाखेचे गठन.

56

नागभिड नगरपरिषद मधे शिवसेनेचा झंझावात

प्रभाग क्र.8 नागभीड ( खैरी चक ) येथील 39 महिला आणि पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश व महिला आघाडी शाखेचे गठन.

नागभिड नगरपरिषद मधे शिवसेनेचा झंझावात प्रभाग क्र.8 नागभीड ( खैरी चक ) येथील 39 महिला आणि पुरुषांचा शिवसेनेत प्रवेश व महिला आघाडी शाखेचे गठन.

*अरुण रामुजी भोले*
*नागभिड तालुका प्रतिनिधी*
*9403321731*

नागभिड: -शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख लाडके मुख्यमंत्री सन्मा. उध्दव साहेब ठाकरे,युवासेनाप्रमुख, पर्यटनमंत्री सन्मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच आमचे संपर्क प्रमुख मा. प्रशांतदादा कदम साहेब, विधानसभा संपर्क प्रमुख मा. आसिफजी बागवान साहेब, जिल्हा प्रमुख मा. मुकेशभाऊ जीवतोडे साहेब, उप-जिल्हा प्रमुख मा. अमृतभाऊ नखाते यांचे मार्गदर्शनात आणि शहर प्रमुख श्रीकांत भाऊ पिसे, उप-तालुका प्रमुख मनोज लडके आणि महिला आघाडी शहर प्रमुख सरोजताई खापरे यांचे नेतृत्वात, मयूर वंजारी आणि कविता सहारे यांचे प्रमुख उपस्थितीत (खैरी चक) प्रभाग क्र.8 नागभीड येथील 39 महिला आणि पुरुषांचा शिवसेनेत सक्रिय प्रवेश घेण्यात आला व महिला आघाडी शाखेचे गठन करण्यात आले.

या प्रसंगी, सौ. उज्वला सुनील खोकले शाखा प्रमुख,सौ. प्रीती मयूर वंजारी उप-शाखा प्रमुख, सौ. अमृता किशोर रामटेके शाखा सचिव, सौ. अंजु पुरुषोत्तम चुधरी शाखा सहसचिव, सौ.शोभा सुशील रामटेके शाखा संघटक यांची महिला शाखा घोषित करण्यात आली यावेळेस बहुसंख्येने महिला आणि पुरुष उपस्थित होते.
येत्या नगर परिषद निवडणुकीत फगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार सर्व महिला आघाडी तसेच उपस्थित पुरुषांनी केला.
सर्वांचे शिवसेना परिवारात स्वागत तसेच पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या