विसापूर येथे भजनाच्या गजरात संत रविदास जयंती साजरी.
सौ. हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्यूज चंद्रपूर
मो 9764268694
विसापूर : संत रविदास बहुउद्देशीय सेवा मंडळ, संत रविदास जयंती कृती समिती, व संत रविदास महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १५ फेब्रुवारी २०२२ ला तारखे प्रमाणे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४५ वी जयंती गावातील महापुरुषाच्या प्रतिमेला मंडळाच्या वतीने माल्यार्पण करून भजनाच्या गजरात साजरी करण्यात आली.
दरम्यान मंडळाच्या वतीने सकाळी पाच वाजता ग्रामस्वच्छता,आठ वाजता संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दुपारला गावातील महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले ; संत रविदास समाज मंदिरात भजनाचा आणि सायंकाळी मार्गदर्शनाचा व लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता उपस्थित संत रविदास अनुयायांना स्नेह भोजन देऊन करण्यात आले. दरम्यान गावातील ग्रामपंचायत कमिटी, मुस्लिम समाज बांधव,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका, अ.भा. गुरुदेव सेवा मंडळ यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात वर्षा दुबे ,इंदिरा नवले ,शैला खंडाळे,सिंधू वाढई,मीरा लिपटे, संध्या वादेकर, वैशाली वाढई समीक्षा भटवलकर, गीता गुजरकर, मिरा खंडाळे,देवका गुजरकर व संदीप काकडे,पिंटू वाढई ,नरेश लिपटे, सुभाष भटवलकर,रवी मुळे, नत्थु दाहेदार,पंढरी गुजरकार, उद्धव खंडाळे,नामदेव लिपटे निखिल बच्चाशंकर ,विशाल बच्चाशंकर यांनी अथक परिश्रम घेतले.