चिमूर तालुक्यातील जामभूळघाटातील प्राध्यापक डॉ. बनसोड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा केला वापर. सहा एकर शेतीत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड करून शेतीच्या उत्पादनात त्यांनी घडविली क्रांती

53

चिमूर तालुक्यातील जामभूळघाटातील प्राध्यापक डॉ. बनसोड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा केला वापर.

सहा एकर शेतीत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड करून शेतीच्या उत्पादनात त्यांनी घडविली क्रांती

चिमूर तालुक्यातील जामभूळघाटातील प्राध्यापक डॉ. बनसोड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा केला वापर. सहा एकर शेतीत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड करून शेतीच्या उत्पादनात त्यांनी घडविली क्रांती

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

चिमूर : -वडिलोपार्जित शेती असल्याने अनेक जण पारंपरिक शेती करून खरीप व रब्बीचे पिकं घेतात. मात्र निसर्गाच्या अनियमितपणामुळे ही शेती फायद्याची कमी व नुकसानीची जास्त असते. त्यामुळे अनेक सुशिक्षित शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचा प्रयत्न करतात.
असाच एक प्रयत्न चिमूर तालुक्यातील जामभूळघाटातील प्राध्यापक डॉ. बनसोड यांनी केला आहे. सहा एकर शेतीत आयुर्वेदिक वनौषधींची लागवड करून शेतीच्या उत्पादनात त्यांनी क्रांती घडवून आणली आहे.
चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील रहिवासी असलेले प्राध्यापक डॉ. गजानन बनसोड यांचे प्राथमिक शिक्षण चिमूर तालुक्यात झाले. वडील सरकारी नोकरीवर असल्याने 12 वी पर्यंतचे शिक्षण वरोरा येथे तर उच्चमाध्यमीक शिक्षण नागपूर येथे झाले. शिक्षणानंतर बनसोड यांनी चिमूर येथेच आठवले समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली.
मुलांना समाजकार्याचे धडे देतानाच सुट्टीच्या दिवशी व महाविद्यालयातील ड्यूटीनंतरचा त्यांनी आपला अतिरिक्त वेळ शेतीसाठी दिला. समाजकार्यात डॉक्टरेट असलेल्या डॉ. बनसोड यांनी पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन शेती करण्याचा मानस करीत वडिलोपार्जित शेतीत वनौषधींची लागवड केली. अलोविरा, म्हाबृंगराज, अनंतमूळ, नागरमोथा, कचोरा या वनौषधींची लागवड त्यांनी आपल्या शेतात केली.
दोन एकर शेतात अलोविरा, काही भागात इतर पिकांची लागवड करून मागील चार वर्षांपासून हा प्रयोग सुरू आहे. यामधून डॉ. गजानन बनसोड हे वर्षाला लाखो रुपयांचे उत्पादन घेत आहेत.