तहसीलदार साहेब हिंगणघाट यांना सावली वाघ येथील गिट्टीखदान मालकांनी दाखवली केराची टोपली
प्रहार जनशक्ती पक्षाने घेतली आंदोलनाची दखल
✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078
हिंगणघाट :-आज दिनांक १६/०२/२०२२ बुधवार रोजी तहसील कार्यालय हिंगणघाट येथे मा. तहसीलदार मसाळ साहेब यांनी सावली (वाघ) येथील गिट्टीखदानीवरील अवजड वाहतूक बंद करण्यात यावी यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये ग्रामपंचायत प्रशासन सावली (वाघ) गिट्टीखदान मालक व गावकऱ्यांना बोलविण्यात आले होते परंतु गिट्टीखदान मालक व ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार साहेबांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित अपमान केला आहे .यामुळे या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. त्यामुळे उद्यापासून गावामधून कोणत्याही प्रकारची अवजड वाहतूक होनार नाही याची हमी गावकरी व प्रहार जनशक्ती पक्ष सावली वाघ यांनी घेतली असून यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहतील असे सुद्धा सांगण्यात आले आहे.या अगोदर आंदोलन स्थळी येऊन गिट्टीखदान मालक व तहसीलदार साहेब यांनी आंदोलन कर्त्यांना आश्वासन दिले होते.
या बैठकीला प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख व रुग्णमित्र गजू कुबडे , उपजिल्हा प्रमुख राजू बोभाटे, प्रहार सेवक अनंता वायसे, अमित जोगे, मयूर पुसदेकर सावली वाघ प्रहारचे शाखा प्रमुख दीपक पावडे, पराग तिखट, रोशन बरबटकर, गजानन जरिले, प्रकाश मने, प्रकाश गौळकर , करण विटाळे, अमित कुटे, अनिकेत विटाळे, निलेश कुटे, सेलू चे प्रहार कार्यकर्ते विजय सातपुते, व समस्त गावकरी उपस्थित होते.