अलर्ट सिटीझन फोरम सामाजिक संस्थेने साजरा केला अनोखा व्हॅलेंटाइन डे

57

अलर्ट सिटीझन फोरम सामाजिक संस्थेने साजरा केला अनोखा व्हॅलेंटाइन डे

पूनम पाटगावे

मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- अलर्ट सिटीझन फोरम ही मुंबईतील एक अग्रगण्य आणि सतत नवीन असे सामाजिक उपक्रम राबविणारी एक संस्था आहे. या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत १३ वा वर्धापनदिन जानेवारी महिन्याच्या अखेरीस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या संस्थेने वर्धापन दिनाचे औचित्य साधून आदिवासी पाड्यातील १० शाळांना प्रत्येकी ३ याप्रमाणे ३० सायकली वाटप करण्यात आल्या. संस्थेच्या वर्धापनदिनी विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, संस्थांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

       १४ फेब्रुवारी म्हटले की प्रेमी युगुलांसाठी असतो तो प्रेमदिवस. सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं ते हया दिवसाला घेऊन असलेले आकर्षण आणि ह्याच विचारांचे परिवर्तन करण्याच्या या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत माणुसकी रूजवण्याच्या हेतूने या संस्थेने एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मागील ६ वर्षांपासून ही संस्था विभागातील वृद्ध नागरिक, वाॅचमेन , सफाई कामगार, पोस्टमन, ट्राफिक पोलिस, डॉक्टर यांसारख्या सामाजिक कर्तव्य पार पाडत योगदान देणाऱ्या व्यक्तींसोबत साजरा करते. सामाजिक बांधिलकी निर्माण करत १४ फेब्रुवारी हा दिवस “आपुलकीचा दिवस” म्हणून साजरा करत आहे.

       यंदाच्या ७ व्या वर्षी देखील बेस्ट बस कर्मचारी आणि पेट्रोलपंप कर्मचारी यांना या संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती तसेच या दिवसाचे विशेष महत्व सांगत कर्मचारी वर्ग यांना “प्रेमाचं प्रतीक भेट” म्हणून देण्यात आले. यावेळी बेस्टचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. 

          सतत नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या अलर्ट सिटीझन फोरम संस्थेच्या ह्या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांमुळे खूप जणांचे चेहरे सुखावले व आनंद अनुभवायला मिळाला. या व्यतिरक्त मुंबईत, ठाणे व पालघर जिल्ह्यात विविध संस्था व संस्थेचे सदस्य यांनी देखील हा उपक्रम राबवत सामाजिक संदेश दिला. 

हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सहकारी, देणगीदार, हितचिंतक यांनी विशेष योगदान दिले त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानन्यात आले.