रातवड येथे वावेदिवाली केंद्र आनंद मेळावा उत्सवात साजरा

66

रातवड येथे वावेदिवाली केंद्र आनंद मेळावा उत्सवात साजरा

प्रकाश खैरनार

माणगांव शहर प्रतिनिधी

मो: 9970664993

इंदापूर :-माणगांव तालुक्यातील रातवड येथे दि.१६ फेब्रुवारी रोजी वावेदिवाळी केंद्र तर्फे झालेल्या मराठी शाळा आनंद मेळाव्यामध्ये केंद्रातील १३ शाळांनी सहभाग घेतला .यावेळी संगीत खुर्ची ,चमचा गोटी ,सामूहिक डान्स स्पर्धा पार पडल्याा.

त्यामध्ये वडाचीवाडी शाळेचे विध्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई गाण्यावर डान्स सादर केला . यामध्ये समृद्धी कदम, मनाली पवार, माधवी पवार, वीरेंद्र पवार, निल कदम सुजाता कोळी,प्रिया जाधव या विद्यार्थी वर्गानी सहभाग घेतला .तसेच संगीत खुर्ची व चमचा गोटी मध्ये निल कदम या पहिला नंबर काढला असून गोणी उडी मध्ये सुजाता केशव कोळी पहिला नंबर.पटकवला .रा .जी .परिषद शाळा वडाचीवाडी पहिला नंबर .तर , दुसरा नंबर .रा .जी परिषद शाळा भुवन. व , रा .जी .परिषद शाळा रातवड शाळेचा तिसरा नंबर आला.

यावेळी केंद्र:- वावेदिवाळी चा बालमेळावा केंद्र प्रमुख:- श्री .अशोक काळे सर श्री .हेमंत बारटक्के व श्रीम .मोना महाले मॅडम.श्रीम .मोरे मॅडम.श्री.सुधीर निकम सर व श्री . राजीव सावंत सर, सर्व शिक्षक बंधू भगिनी सर्व शाळांचे अध्यक्ष ,सदस्य व पालक वर्ग उपस्थित होते .यावेळी अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले .

रातवड ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री .सतीश पवार व रातवड आदिवासी वाडी शाळेच्या उपशिक्षिका सौ. संजीवनी पवार यांच्या फॉर्म हाऊस वर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात अनेक पालक वर्गानी तसेच विद्यार्थीवर्गानी आनंद साजरा केला.