ग्रामपंचायत कुडगाव श्रीवर्धन मध्ये एकाच वेळी आर्थिक गैरव्यवहारमुळे चार ग्रामसेवकांचे निलबन
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
मो: 8080092301
रायगड :-रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार सरपंचसह तत्कालीन ग्रामसेवकांना चांगलाच फटका पडला आहे. या प्रकरणी कोकण विभागीय आयुक्ताकडे निलेश पवार यांनी तक्रार दाखल केली होती तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्ताने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून प्राथमिक चौकशीत चार ग्रामसेवकाचे निलबन, भ्रष्टाचारी रक्कम सरपंचाकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही टपका ठेवला आहे.
कुडगाव ग्रामपंचायतमध्ये 2009 ते 2016 या कालावधीत झालेल्या आर्थिक गैरव्यहरात सखोल चोकशी करण्याची मागणी तक्रारदार पवार यांनी केली आहे. यात प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेले ग्रामसेवक संजय श्रीवर्धनकर, रवींद्र सोनावणे, याच्यावर निळंबनाची कारवाई केली तसेच त्याच्यावर खातेअंतर्गत चौकशी बजवण्यात आली असून अनुक्रमे कुडगाव ग्रामपंचायतमध्ये पुढील चोकशी प्रक्रिया चोकशी सुरु राहणार आहे.यांच्यामध्ये किती रुपयाचा काळा बाजार झाला आहे. याचा विचार केला जात आहे.ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर कारवाई केली जाईल.
डॉ. किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद एक वेतनवाढी कायमस्वरूपी थांबवण्यात आला आहे. जिल्हा परिषदकडून या प्रकरण्यात तात्कालिन सरपंच दगडू कवीनकर आणि नागुबाई वाघमारे याच्यावर भ्रष्टाचारी रक्कम निश्चित करून वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विस्तार अधिकारी किशोर नागे व तात्कालिन विस्तार अधिकारी चिमाजी हबीर यांच्या खाते निहाय चोकशीचे आदेशही दिले गेले आहे. त्याच बरोबर जिल्हा परिषद चे तात्कालिन कनिष्ठ सहाय्यक कैलास चव्हाण वरिष्ठ सहाय्यक प्रसाद ठाकरे यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले आहेत. तात्कालिन कनिष्ठ प्रशासन अधिकारी अंजली वर्तक यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावन्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदमध्ये ही सर्वात मोठी कारवाई असून अंतिम कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.