अवैध धंदे तातडीने बंद करावे
त्रिशा राऊत नागपूर
जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
उमरेड=>उमरेड शहर ग्रामीण विभागात गुन्हेगारी ,अवैध धंदे व टॉपिक पोलिसांची मनमाणिक सतत वाढ होऊन कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याबाबतची निवेदन शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमरेड पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांना हे निवेदन देण्यात आले.
1) निवेदन सादर करण्यात येते की , उमरेड शहर मध्ये व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मोहाच्या दारूचे कारखाने दिसून येतात. खुल्या मोहाची दारू विक्री केली जाते. तसेच सट्टापट्टी तंबाखूची गांजाची मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून उमरेड शहर मोठे हब झालेला आहे. गिट्टीची अवैद्य वाहतूक. नो परमिट ट्रॅव्हल्स. आवर लोड ट्रक मधून अवैध रेती विक्री, जुगार गांजा नशेली पदार्थांची विक्री सामाजिक स्थळावर सेवन करणे खुल्याम सुरू आहे. तसेच टॉपिक पोलिसांकडून नागरिकांची खुल्याआम लूट सुरू आहे.१५ते १८ वर्षाच्या वयातील मुले व मुलींचे अधीन झाल्याचे दिसून येत आहे. ड्रग्स माफीयाचे जाळे पसरलेले दिसून येत आहे
2) राजस्व अधिकाऱ्याशी संगणमत करून बांधकामाचे साहित्य गिट्टी.रेती.मुरूम मोठ्या प्रमाणात कोळसा इत्यादी खनिजाचे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाहतूक व तक्रारी सुरू आहे.
3) शहरात व ग्रामीण भागात नागरिकांच्या गैरहजेरी चा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात घरफोडी व चोरीचे प्रमाण वाढले आहे. तसेच ग्रामीण भागात शेतातील शेतमाल व इलेक्ट्रिक मोटरपंप व शेती उपयोगी अवजारांची चोरी होत असल्याचे गुन्हे आढळून येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच विद्यार्थी तरुणांवर व समाजावर दुष्परिणाम होत असल्याचे आढळून आले आहे. सबब जनमानसात संबंधित प्रशासकीय यंत्रणेची निष्क्रिय बद्दल रोष निर्माण झालेला आहे व सतत गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याने शांतता भंग होण्याची परिस्थिती उद्भवलेली आहे. अशा परिस्थितीत संबंधित प्रशासकीय विभाग व अधिकारी यांच्याकडून तात्काळ लक्ष पुरविणे व उपाय करणे आवश्यक आहे. शहरातील व ग्रामीण भागातील विस्कळीत कायदा व सुव्यवस्था जनहिताला पोषक होईल असे वातावरण निर्माण करणे नितांत जरुरीचे झाले आहे. अश्या परिस्थितीत वरील बाबीकडे आपल्या स्तरावर लक्ष पुरविणे व संबंधित विभाग पोलीस यंत्रणेला आवश्यक निर्देश देणे सुद्धा जरुरीचे झाले आहे. वारंवार निवेदन देऊन सुद्धा तात्पुरते अवैध धंदे बंद होतात परंतु काही दिवसात पुन्हा सुरू करतात. जन आंदोलनातून उमरेड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात येईल. सबब विनंती आहे की वरील वस्तूस्थिती बाबत आपल्या स्तरावरून चौकशी आदेश पारित करण्याची कृपा करावी.तसेच संबंधित निष्क्रिय व भ्रष्टाचारी पोलिस अधिकारी यांचा विरुद्ध विभागीय चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी ही विनंती.