तळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना शिंदे गटआणि भाजप यांची जुळवाजुळव? पाणी पुरवठा भूमिपूजन सोहळा एकत्रीत पार पडणार

56
तळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना शिंदे गटआणि भाजप यांची जुळवाजुळव? पाणी पुरवठा भूमिपूजन सोहळा एकत्रीत पार पडणार

तळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना शिंदे गटआणि भाजप यांची जुळवाजुळव? पाणी पुरवठा भूमिपूजन सोहळा एकत्रीत पार पडणार

तळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना शिंदे गटआणि भाजप यांची जुळवाजुळव? पाणी पुरवठा भूमिपूजन सोहळा एकत्रीत पार पडणार

किशोर पितळे तळा तालुका प्रतिनिधी 

९०२८५५८५२९

तळा :- तळा तालुका हा राष्ट्रवादीकाँग्रेसचा बालेकिल्ला आहे तळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद सत्ता आहे.तळा शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गततळाशहर पाणी पुरवठा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळाआयोजित करण्यात आला आहे.ही योजना आमच्याच नेत्याने मंजूर करून आणली आहे असे सर्वच पक्षातील कार्यकर्ते बोलत आहेत.लोकसभा आचार संहिता लागण्यापूर्वीयायोजनेचेभूमिपूजनकरण्याचेठरविण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या भूमिपूजनाची तारीख निश्चित केली शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांनी आम्हाला विश्वासात घेत नाही म्हणून वेगळी वाट धरली आणि कार्यक्रमाचे नियोजन आखले आणि पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभाचे नियोजन केलेपरंतु हा वाद वरिष्ठपातळीवर पोचल्या नंतर पक्ष नेतृत्वाने सर्वांना एकत्रित कार्यक्रम करण्या संदर्भात सूचना केल्या त्यानुसार हा कार्यक्रम आता १७ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सगळ्यांचे एकमत झाले आहे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते संध्याकाळी ५.वाजता.गो. म.वेदक शाळेसमोरील मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार. मा.सुनील तटकरे, प्रमुख उपस्थीती मा.उदयजी सामंत पालकमंत्री रायगड, मा.आमदार भरतशेठ गोगावले विधानसभा सदस्य आमदार कु.अदितीताई तटकरे मा.आमदार अनिकेत तटकरे विधानपरीषद सदस्य, आमदार मा.निरंजन डावखरे विधान परिषद सदस्य उपस्थित रहाणार आहेत.

            लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत सर्वच राजकीय पक्षांनी रायगड लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे,या मतदार संघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे हे पुन्हा निवडणूक लढण्यासाठी ईच्छुक आहेत तर भाजपने देखील या मतदार संघावर दावा केला असून भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष ध्येर्यशिलदादा पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली आहे त्यामुळे या मतदार संघात नेतेमंडळींनी मशागत सुरू केली आहे.मागील काही दिवसात उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हा पिंजून काढला या मतदार संघातून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली असून ते कामाला लागले आहेत.आता तळाशहरातील चार शतकाचे राजकारण हे पाण्यावरशिजतआलेआहे. यामुळे वावे धरणातील पाण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेते मंडळी करणार हे स्पष्ट आहे राजकीय पक्ष याचे श्रेय सर्वच राजकीय नेत्यांना असल्याचे सांगत सर्वच नेत्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालविला आहे.यातून त्यांना केवळखासदारकी ची निवडणूक पार पाडण्याची मनिषा दिसून आहे. तुर्तास हा कार्यक्रम एकत्रित होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून योजनेचे श्रेय कोणीही घ्या, पण तहानलेल्या तळेवसियांना पाणी पाजा अशी नागरीक चातक पक्षाप्रमाणे वाट पहात आहेत.