कला ही दिव्यांग (अपंग) नसते.राज्याध्यक्ष साईनाथ पवार “एक सूर मेरी पहेचान”दिव्यांग आनंद महोत्सव संपन्न.

58
कला ही दिव्यांग (अपंग) नसते.राज्याध्यक्ष साईनाथ पवार "एक सूर मेरी पहेचान"दिव्यांग आनंद महोत्सव संपन्न.

कला ही दिव्यांग (अपंग) नसते.राज्याध्यक्ष साईनाथ पवार
“एक सूर मेरी पहेचान”दिव्यांग आनंद महोत्सव संपन्न.

कला ही दिव्यांग (अपंग) नसते.राज्याध्यक्ष साईनाथ पवार "एक सूर मेरी पहेचान"दिव्यांग आनंद महोत्सव संपन्न.

किशोर पितळे तळा तालुका प्रतिनिधी 

९०२८५५८५२९

तळा :-समाजकल्याण विभाग,रायगड जिल्हा परिषद,दिव्यांग संस्था व दिव्यांग कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी गुणांना वाव मिळण्यासाठी उदात्त हेतूने”एकसूर मेरीपहेचान”जिल्हास्तरीय सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन १४ फेब्रु.२४ भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय श्रीबाग येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाला मा.आम.महेंद्रजी दळवी, मुख्यकार्यकारीअधिकारी जि.प.भरत
बास्टेवाड,सहा.मु.का.अधिकारी सत्यजीत बडे,समाज कल्याण अधिकारी डाॅ.शामराव कदम, जिल्हाध्यक्ष साईनाथजी पवार आई फांऊडेशनचे संस्थापक राजा साळुंखे वगैरे मान्यवर व्यासपिठावर उपस्थीत होते.
यावेळी उपस्थीत दिव्यांगांना संबोधित करताना साईनाथ म्हणाले की.दिव्यांग हा दिव्यांग किंवा अपंग नसतो परंतू समाजातील घटक समजून सुदृढ नजरेने बघीतले पाहिजे त्याच्या अंगी असणारे कलागुणांनावावमिळण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून कला जिवंत असते ती दिव्यांग किंवा अपंग नसते.ती जोपासावी असे आवाहन केले.यावेळी मुक बधीर, कर्णबधीर,दिव्यांग यांनी आपली कला दाखवून सांस्कृतीक कार्यक्रमात भक्तीगीत,पौराणीक सण,कोळी गीते, शिवशाहिरी सादर केली.अमोल अमित जाधव युट्यूब चॅनलचे मालक यांनी बहारदार “आई तुझा डोंगरबघ किती सुंदर “,भगवा मानाने फडकतो,व साई तेरा चमत्कार या गाण्याने व केशव मालोरे यांनी बहार दार गाण्यांनी रसीक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.व अनेक दिव्यांगांना आपली कला सादर केली. यावेळी जनांर्दन पानबंध दिव्यांगांवर मात करुन रायगड किल्ला,कळसुबाईचे शिखर व अनेक गडकिल्ले सर केले त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी पानबंधम्हणाले कि दिव्यांगांना न्यूनगंड न बाळगता आपल्याला दुर्दैवाने आलेल्याअपंगत्वा वर मात करीत आपले असणारै कौशल्य,कला,शैक्षणीक,सांस्कृतीक हीदेणगी असते त्यानुसार त्या क्षैत्रात दाखवावे असे आवाहन केले. यावेळी बाॅडी बिल्डर प्रतीक मोहीते खोपोली यांनी बाॅडी बिल्डर स्पर्धेत गीनीज बुक रेकाॅर्ड मध्ये छोटा बिल्डर मिळवलेल्या यशाबद्दल तसेच किशोर वेखंडे यांना दिव्यांग सेवा पुरस्कार सेवानिवृती पुर्व सन्मान चिन्ह उपस्थीत मान्यवरांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजा पाटील सर यांनी केले.