अलिबाग येथे क्रिकेट नियमांचा परिसंवाद संपन्न

80

अलिबाग येथे क्रिकेट नियमांचा परिसंवाद संपन्न

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग व अलिबाग क्रिकेट अॅकॅडमी किहीम यांच्या पुढाकाराने, जिल्हा रायगड पोलीस यांच्या सहकार्याने व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने क्रिकेट नियमांचा परिसंवाद अलिबाग मध्ये जंजिरा हॉल रायगड पोलीस मुख्यालय येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आरडिसीए चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील, माणुसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, आरडिसीए च्या महिला क्रिकेट प्रमुख अदिती दळवी, सदस्य पंकज पंडित, प्रदिप खलाटे, रायगड पोलिस उज्ज्वल भविष्यसामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव, तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका जिविता पाटील, अलिबाग क्रिकेट अॅकॅडमी चे हेड कोच संदीप जोशी, डॉ भूषण पाटील, माणुसकी प्रतिष्ठान सदस्य आरसीएफ चे अभय घरत, यासीन सोंडे व इतर क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
या परिसंवादात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पंच तसेच रणजीपटू हर्षद रावले, एमसीए पंच राजन कसबे हे पुर्ण वेळ उपस्थित होते व उपस्थितीतांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरं देऊन उत्तम मार्गदर्शन केले.

या परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक, एमसीसी लॉ
अभ्यासक व आरडिसीए चे मार्गदर्शक, कोच नयन कट्टा यांनी अतिशय सोप्या भाषेत व प्रात्यक्षिकं करून क्रिकेट चे नियम समजावून सांगितले. परिसंवादात एकुण 41 जणानी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाच्या शेवटी आपले मनोगत व्यक्त करताना रायगड चे माजी खेळाडू अभिजित तुळपुळे यांनी सांगितले की या परिसंवादामुळे क्रिकेट नियमां विषयी उपस्थितीतांचे अनेक गैरसमज दूर झाले व अनेक नवीन नियम शिकण्यास मिळाले.
डॉ. राजाराम हुलवान यांनी हा परिसंवाद म्हणजे क्रिकेट प्रेमी ना येणाऱ्या शंकांचे निरसन होणार आहे क्रिकेट सामन्यावेळी उद्भवणारे वाद कमी होतील असे सांगितले.
परिसंवादाचे सूत्रसंचालन अँड.पंकज पंडित यांनी उत्तम रित्या पार पाडले.