दुचाकीस्वाराचा जागीच झाला मृत्यू.

59

दुचाकीस्वाराचा जागीच झाला मृत्यू.

त्रिशा राऊत
क्राईम रिपोटर नागपुर जिल्हा प्रतिनिधि .मो 9096817953

उमरेड : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घटना शनिवारी (ता. १५) सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास चक्रीघाट परिसरात घडली.

प्राप्त दुचाकीस्वार माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५.३० ते ६ च्या सुमारास दुचाकी (क्र. एमएच ४९/ एएच ७७५९) ने नागपूरच्या दिशेने जात होता. चक्रीघाट परिसरात समोरून भरधाव व चुकीच्या बाजूने आलेल्या एमएच ४२/ टी९१२५ ट्रकने दुचाकीला धडक दिली. चाकीखाली आल्याने दुचाकीस्वाराचा चेंदामेंदा झाला. माहिती मिळताच उमरेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. पंचनामा करून मृतदेह उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. मृतक नागपूरचा असून सेल्स म्यान असल्याचे कळते. वृत्तलिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.